चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की…

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. याबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं की...
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 9:23 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे. आयसीसी स्पर्धेचं आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्वोतोपरी तयारी केली आहे. स्पर्धेचं प्रारूप वेळापत्रकापासून नियोजनापर्यंत खलबतं सुरु आहेत. फक्त भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही यावर घोडं अडून बसलं आहे. बीसीसीआयने भारतीय पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. भारत सरकाराने परवानगी दिली तरच टीम इंडिया पाकिस्तानात येईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेलं विधान महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या विधानाचा सरळ अर्थ भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असाच निघत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध केला. तसेच भारत पाकिस्तान संबंधांबाबत स्पष्टपणे सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, ‘जोपर्यंत तिथला दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तान सरकारशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. त्याआधी आम्हाला जम्मू काश्मीरमधील तरूणांच मत जाणून घ्यायचं आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे.’ अमित शाह यांचं हे विधान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेलाही लागू होत आहे. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट होत आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यापूर्वीच बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड स्वरुपात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती केली आहे. मात्र आयसीसीकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय आलेला नाही.

दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली आहे. 1 डिसेंबरपासून ते कार्यभार सांभाळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली होती. तेव्हा भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. तसेच अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.