Team India | गुरुवारी टीम इंडियाचे 2 सामने, कसं काय?
Indian Cricket Team | टीम इंडिया 25 जानेवारी रोजी 2 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध आहे, हे माहिती आहे. पण दुसरा सामन्यात टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?
मुंबई | टीम इंडिया गुरुवार 25 जानेवारीपासून इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयार झाली आहे. टीम इंडिया विराट कोहली याच्या अनुपस्थितीत आणि मोहम्मद शमी याच्याशिवाय इंग्लंड विरुद्ध दोन हात करणार आहे. टीम इंडिया या होम सीरिजमध्ये इंग्लंडवर वरचढ होण्याचा प्रयत्न करेल. तर इंग्लंडही जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार आहे. टीम इंडिया गुरुवारी एकूण 2 सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना हा इंग्लंड विरुद्ध असणार आहे हे माहित आहे. पण दुसरा सामना कोणा विरुद्ध आणि कुठे असणार, असा प्रश्न पडला असेल. त्याबाबत जाणून घेऊयात.
टीम इंडिया अंडर 19 वनडे वर्ल्ड कपमध्ये आपला दुसरा सामना 25 जानेवारी रोजी खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर आयर्लंडचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील दुसरा सामना आहे. टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला. तर आयर्लंडचा हा तिसरा आणि साखळी फेरीतील अखेरचा सामना आहे.
आयर्लंडने पहिल्या सामन्यात यूएसवर विजय मिळवला. मात्र दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने आयर्लंडला पराभवाची धुळ चारली. टीम इंडिया 2 पॉइंट्ससह ए ग्रुपमध्ये नंबर 1 आहे. तर त्यानंतर आयर्लंड, बांगलादेश आणि यूएसएचा समावेश आहे. आयर्लंडसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे आयर्लंड पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
अंडर 19 टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.
अंडर 19 आयर्लंड टीम | फिलिपस ले रॉक्स (कॅप्टन), जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकीपर), गेविन रौल्स्टन, कियान हिल्टन, स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, हॅरी डायर, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, रूबेन विल्सन, मॅकडारा कॉसग्रेव्ह, फिन लुटन, मॅथ्यू वेल्डन आणि डॅनियल फोर्किन.