Team India | 3 टीम आणि 13 दिवस, टीम इंडियाचं वर्षातील पहिल्या महिन्यातील वेळापत्रक
Team India Schedule In January 2024 | टीम इंडिया 2024 वर्षातील पहिल्याच महिन्यात एकूण 3 संघांचा सामना करणार आहे. टीम इंडिया जानेवारीतील 31 दिवसांपैकी 13 दिवस मैदानात असणार आहे. जाणून घ्या एका महिन्याचं वेळापत्रक.
मुंबई | क्रिकेट टीम इंडियासाठी 2023 वर्ष शानदार राहिलं. टीम इंडियाला 2023 या वर्षात हवं ते मिळालं शिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी. ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत करुन विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंग केलं. आता टीम इंडिया हा पराभव विसरुन नववर्षात 2024 मध्ये धमाकेदार कामगिरी करण्याच्या मानसाने उतरणार आहे. टीम इंडिया नववर्षात जवळपास 50 सामने खेळणार आहे. त्याआधी टीम इंडिया फक्त जानेवारीत किती सामने खेळणार आहेत हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नववर्षातील पहिला आणि या दौऱ्यातील अखेरचा सामना खेळणार आहे. या दौऱ्यातील आणि कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौरा संपवून भारतात परतेल.
दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर टीम इंडिया घरात अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळेल. ही टी 20 मालिका असणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होईल. तर 17 जानेवारीला अखेरचा सामना पार पडेल. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात खऱ्या अर्थाने या टी 20 मालिकेने होईल. यंदा 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप असल्याने सर्वच संघांसाठी टी 20 मालिका महत्त्वाच्या आहेत.
अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होईल. या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. एकूण 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अभिमन्यू इसवरन, मुकेश कुमार आणि आवेश खान.
दक्षिण आफ्रिका | टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, केशव महाराज, लुंगी एनगिडी, विआन मुल्डर आणि ट्रिस्टन स्टब्स.