Team India: 5 महिने 10 सामने, रोहितसेनेची ‘कसोटी’, WTC फायनलसाठी 3 संघांचं आव्हान

Indian Cricket Team: टीम इंडियाला रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पुढील 111 दिवसांमध्ये 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतासमोर एकूण 3 संघांचं आव्हान असणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक.

Team India: 5 महिने 10 सामने, रोहितसेनेची 'कसोटी', WTC फायनलसाठी 3 संघांचं आव्हान
team india testImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 10:52 PM

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावरुन आल्यानंतर सध्या रिलॅक्स मोडमध्ये आहे. टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात श्रीलंकेला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप दिला. त्यानंतर रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत भारताला एकदिवसीय मालिका गमवावी लागली. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत राहिल्यांतर श्रीलंकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकले. श्रीलंकेने अशाप्रकारे 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर श्रीलंका आता इंग्लंड दौऱ्याला रवाना झाली आहे. तर टीम इंडिया पुढील महिनाभार विश्रांतीवर असणार आहे. मात्र त्यानंतर टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम आहे.

टीम इंडिया पुढील 5 महिन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 111 दिवसांमध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळणार आहे. भारतासमोर बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाला टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या गदेने 2वेळा हुलकावणी दिली आहे. टीम इंडियाचा 2021 साली न्यूझीलंड तर 2023 मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभव केला. त्यामुळे यंदा तिसऱ्या प्रयत्नात टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहचून विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र टीम इंडियाचा यात चांगलाच कस लागणार आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 2, न्यूझीलंड विरुद्ध 3 तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे.

टीम इंडिया बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. उभयसंघात प्रतिष्ठेची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. आपण या तिन्ही मालिकांचं वेळापत्रक जाणून घेऊयात

इंडिया-बांगलादेश कसोटी मालिका

पहिला सामना, 19-23 सप्टेंबर, चेन्नई

दुसरा सामना, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर

इंडिया न्यूझीलंड टेस्ट सीरिज

पहिला सामना, 16-20 ऑक्टोबर, बंगळुरु

दुसरा सामना, 24- 28 ऑक्टोबर, पुणे

तिसरा सामना, 1-5 नोव्हेंबर, मुंबई

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं शेड्यूल

पहिला सामना, 22-26 नोव्हेंबर, पर्थ

दुसरा सामना, 6-10 डिसेंबर, एडलेड

तिसरा सामना, 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन

चौथा सामना, 26-30 डिसेंबर, मेलबर्न

पाचवा सामना, 3-7 जानेवारी 2025, सिडनी

2 संघ आमनेसामने, लवकरच चौघांची कसोटी

दरम्यान सध्या विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. तसेच लवकरच इंग्लंड-श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.

पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.