ind w vs eng w : टीम इंडियाचा इंग्लंडवर 5 विकेटने विजय, मालिकेचा गोड शेवट
Team India win by 5 wickets against England : वुमन्स टीम इंडियाने शेवटचा टी-२० सामना जिंकत मालिकेचा शेवट गोड केला आहे. तीन सामन्यांची मालिका इंग्लंडने आपल्या नावावर केली आहे.
मुंबई : वूमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. इंग्लंड संघावर 5 विकेटने विजय मिळवला असून मालिकेचा शेवट गोड केला आहे. इंग्लंडने दिलेल्या 127 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने 19 व्या ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करत मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाकडून स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने सर्वाधिक 48 धावांची महत्त्वाची खेळी केली. सुरूवातीच्या दोन सामन्यांमझध्ये पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेचा गोड शेवट गोड केला आहे.
इंग्लंड संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सलामीवीर शफाली वर्मा आजही 6 धावांवर परतली. त्यानंतर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना दोघांची चांगली भागीदारी करत विजयाचा पाया रचला.
जेमिमाहने स्वीप शॉट खेळत चौकार मारत धावांचा दबाव कमी केला. 29 धावांची खेळी करताना त्यामध्ये तिने चार चौकार मारले. त्यानंत दीप्ती शर्मा आली होती, दोन चौकार मारत तिनेही चांगली सुरूवात केली. पण तिला 12 धावांवर फ्रेया केम्पने आऊट केलं.
सामना शेवटला गेला तेव्हा सेट झालेली स्मृती मंधाना 48 धावांवर आऊट झाली. स्मृती पाठोपाठ रिचा घोषही चुकीचा फटका मारून आऊट झाली. त्यावेळी सामना फसला असं वाटत होतं मात्र अमनजोत कौर हिने दोम चौकार मारत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. टीम इंडियाने शेवटचा सामना जिंकत मालिकेचा शेवट गोड केला.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (W), श्रेयंका पाटील, तितस साधू, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, माइया बौचियर, अॅलिस कॅप्सी, हीदर नाइट (C), एमी जोन्स (W), डॅनियल गिब्सन, बेस हीथ, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, माहिका गौर