IND vs SL : टीम इंडियाची आशिया कप फायनलमध्ये धडक, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा
U 19 Asia Cup 2024 Final : अंडर 19 टीम इंडियान आशिया कप स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.
टीम इंडियाने अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान अवघ्या 3 विकेट्सच्या मोबदल्यात 21.4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने 175 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीने सर्वाधिक धावा करत इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली आणि विजयाचा पाया रचला. तर त्यानंतर आंद्रे सिद्धार्थ सी, कॅप्टन मोहम्मद अमान आणि केपी कार्तिकेय निर्णायक खेळी करुन भारताला विजयी केलं.
टीम इंडियाची अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची नववी वेळ ठरली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने एकूण 7 वेळा ही ट्रॉफी मिळवलीय. तर एकदा बांगलादेश आणि टीम इंडिया संयुक्त विजेता राहिले आहेत. तर यंदा टीम इंडियासमोर अंतिम फेरीत बांगलादेशचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने 91 धावांची भागीदारी केली. आयुष 28 बॉलमध्ये 7 फोरसह 34 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर आयुषने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. वैभवने 24 बॉलमध्ये अर्धशतक केलं. वैभवने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात यूएईविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. वैभवन या उपांत्य फेरीतील सामन्यात 36 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. आंद्रे सिद्धार्थ सी याने 22 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टम मोहम्मद अमान आणि केपी कार्तिकेय या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं. अमान आणि कार्तिकेय या दोघांनी अनुक्रमे 25 आणि 11 धावा केल्या.
टीम इंडिया फायनलमध्ये, वैभव सूर्यवंशी ‘मॅन ऑफ द मॅच’
A memorable day and innings for Vaibhav Suryavanshi as he steers India U19 to a commanding win and is also awarded the Player of the Match 🏆
Scorecard ▶️ https://t.co/016Tkd99kt#TeamIndia | #ACC | #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/pRLZcNkYR2
— BCCI (@BCCI) December 6, 2024
अंडर 19 श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : विहास थेवमिका (कर्णधार), पुलिंदू परेरा, दुल्निथ सिगेरा, शरुजन षणमुगनाथन (विकेटकीपर), विमथ दिनसारा, लक्विन अबेसिंघे, कविजा गमागे, विरण चामुदिथा, प्रवीण मनीषा, न्यूटन रंजित कुमार आणि मत्थुस.
अंडर 19 इंडिया प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), किरण चोरमले, हार्दिक राज, चेतन शर्मा आणि युधाजित गुहा.