Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने चिंता वाढवली, नक्की काय झालं?
बुमराहला (Jasprit Bumrah) नुकतंच श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर आता आणखी मोठी बातमी समोर आली आहे.
Jasprit Bumrah May Miss Against Australia : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. बुमराह दुखापतीमुळे आधीच टीम इंडियापासून दूर आहे. बुमराहला नुकतंच श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर आता आणखी मोठी बातमी समोर आली आहे. बुमराहला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकावं लागू शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (team india yorker king jasprit bumrah may miss against australia test series due to injurey)
मिळालेल्या माहितीनुसार, बुमराहला या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. बुमराहला टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या आधी पाठदुखीच्या त्रास झाला होता. बुमराहला यातून सावरुन कमबॅकसाठी तयार होता. मात्र यानंतर बुमराहला आणखी एक दुखापत झाली. दुखापतीमुळे बुमराह बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीएत गेला. दुखापत झालेल्या खेळाडूंना एनसीएत पाठवलं जातं. बुमराह एनसीएतून फीट होऊन बाहेर पडला. त्यानंतर बुमराहवर खेळाचा तणाव वाढल्याने त्याचा असह्य झालं.
आता बुमराहला पुन्हा दुखापतीतून सावरण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 1 महिन्याच्या कालावधीत सर्व काही अपेक्षेप्रमाणे झालं तर बुमराह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकतो.
टीम इंडिया श्रीलंकानंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. हा दौऱ्या संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया भारतात टीम इंडिया विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
रोहित काय म्हणाला?
“बुमराहसोबत जे झालं ते दुर्देवी आहे. त्याने एनसीएमध्ये फिट होण्यासाठी फार मेहनत घेतली. बुमराह बऱ्यापैकी तयारही झाला होता. बॉलिंगही करत होता. शेवटच्या 2 दिवसांमध्ये बुमराहने पाठदुखीचा त्रास जाणवत असल्याची तक्रार केली. हे फार गंभीर नाही. जेव्हा बुमराह काही सांगतो तेव्हा आम्ही फार गांभीर्याने घेतो.”अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 9 जानेवारीला दिली.
दरम्यान बुमराह क्रिकेटपासून गेल्या सप्टेंबर महिन्यापासून दूर आहे. त्यामुळे बुमराह पुन्हा ब्लू जर्सीमध्ये खेळताना दिसेल, याबाबत निश्चितता नाही. मात्र बुमराह लवकरात लवकर मैदानात परतावा आणि टीम इंडियाला विजयी करावं, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.