‘माझ्या वडिलांना मेंटल इशू आहे’; युवराज सिंगचा योगराज यांच्याबद्दल बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युवराज आपल्या वडिलांबद्दल बोलत असल्याचं दिसत आहे. युवराजचा हा व्हिडीओ त्याचे वडील योगराज यांनी धोनी आणि कपिलबाबत केलेल्या विधानानंतर व्हायरल होतोय.

'माझ्या वडिलांना मेंटल इशू आहे'; युवराज सिंगचा योगराज यांच्याबद्दल बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 7:31 PM

टीम इंडियाचा चॅम्पियन खेळाडू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. योगराज सिंह यांनी वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव आणि महेंद्र सिंह धोनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. मी माझ्या आयुष्यात धोनीला कधीच माफ करणार नाही, त्याने स्वत:चं तोंड आरशामध्ये पाहिलं पाहिजे. कपिल देवचे अशी वेळ आणणार की जग त्याच्यावर थुंकेल, असं योगराज सिंह म्हणाले होते. या वक्तव्यानंतर धोनी आणि कपिल देवचे चाहते योगराज सिंह यांना ट्रोल करत आहेत. अशातच सोशल मीडियवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

सोशल माडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये युवराज सिंह आपल्या वडिलांबाबत बोलत असलेला दिसत आहे. युवराजे मागील काही दिवसांपूर्वी एत मुलाखत दिली होती. त्यामध्ये तो त्याचे वडील योगराज सिंह यांच्याबाबत बोलताना, माझ्या वडिलांना मेंटल इशू असून ते कधीच मान्य करणार नाहीत, असं युवराज सिंह बोलत आहे. युवराजने रणवीर अल्लाहबादिया याच्यासोबतच्या पॉडकास्टचा आहे.

याआधी योगराज सिंह यांनी गंभीरवर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. महेंद्र सिंह धोनी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये हटकून संथ गतीने खेळत होता. धोनीच्या अशा खेळीने इतर खेळाडू प्रेशरमध्ये आले आणि विकेट गेल्या. धोनीला सेमी फायनल सामना जिंकवायचाच नव्हता, असं योगराज सिंह म्हणाले होते. त्यावेळी या विधानाची क्रिकेट विश्वात चर्चा झाली होती.

युवराज सिंह याने टीम इंडियाकडून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहा बॉलवर सहा सिक्स मारणारा युवराज सर्वांच्याच आठवणीत आहेत. टीम इंडियाने टी-20 मध्ये जिंकलेला पहिला वर्ल्ड कप त्यानंतर वन डे वर्ल्ड कप 2011 मध्येही त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. युवराजला त्यावेळी कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र त्याने कडवी झुंज दिली आणि परत एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला होता.  टीम इंडियासाठी युवराजने 40 कसोटींमध्ये 1900 धावा, 304 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8701 धावा आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1177 धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये युवराज सिंहने 17 शतके केली आहेत.

लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.