Yuvraj singh : द्रविडमुळे सचिनच्या 200 धावा हुकल्या, युवराज सिंगनं नेमकं काय म्हणलं, जाणून घ्या
2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटीची चर्चा आजही होते. त्यात अनेकांचे मतभेद आहेत. वेगवेगळे विचार आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटी दरम्यान राहुल द्रविडने (Rahul Dravid) डाव घोषित केला होता. सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) 194 धावांवर फलंदाजी करत असताना कर्णधार राहुल द्रविडनं डाव घोषित करणं योग्य होते का, या विषयावर आजपर्यंत चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. वेगवेगळं यावर आजही बोललं जातं. तेव्हाची आणि त्या परिस्थितीची आजही चर्चा होते. दरम्यान, यावर युवराज सिंगने भाष्य केलंय. त्यावेळी दुसऱ्या दुहेरी शतकपासून सचिन तेंडुलकर सहा धावा दूर असताना द्रविडने खेळाडूंना पुनरागमन करण्यास सांगितलं. द्रविडची घोषणा करताना पाहून सचिनला धक्काच बसला आणि अफवा अशी आहे की लिटल मास्टर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ वॉशरूममधून बाहेर पडला नव्हता. त्याला आता 16 वर्षे झाली आहे. यावर युवराज सिंग जो त्यावेळी तिथे होता आणि त्याने जवळून त्या गोष्टी पाहिल्याय. त्याचं युवराजने (Yuvraj singh) या घटनेवर मोठं विधान केलं.
Must Read Thread- The Declaration of 194*?#OnThisDay 2004 Sachin Tendulkar 194* Declared by Rahul Dravid Multan Test.
हे सुद्धा वाचाWHAT TEAM DECIDE at Tea- Capt. Dravid & Wright plan: Give Pak 15 over to bat so play acc to plan.
Result- RD Declared in 1 Over before what team decide. pic.twitter.com/UY8DKviRNB
— SachinTendulkar FC ?? CrickeTendulkar (@CrickeTendulkar) March 28, 2022
युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
राहुल द्रविडच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित करत सचिनला 200 धावा करण्याची परवानगी द्यायला हवी होती, असं युवराज म्हणालाय. पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘आम्हाला एक सांगितलं गेलं की आम्हाला वेगानं खेळायचं आहे. आम्ही घोषित करणार आहोत’, असं युवराजनं एक विशेष संवाद कार्यक्रमाता बोलताना म्हटलंय. युवराज म्हणाला की, “त्या सहा धावा त्याला दुसर्या षटकात मिळू शकल्या असत्या आणि त्यानंतर आम्ही 8-10 षटके टाकली. मला वाटत नाही की आणखी कसोटी सामन्यात फरक पडला असता,” पुढे बोलताना तो म्हणतो, ‘जर तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर तुम्हाला संघाला प्रथम स्थान द्यावे लागेल आणि तुम्ही 150 वर असताना त्यांनी त्यावेळी घोषणा केली. यात मतभेद आहेत. मला वाटते की त्याच्या 200 नंतर संघ घोषित करता आला असता,’ असंही युवराज यावेळी म्हणाला.