ICC कडून टेस्ट रँकिंग जाहीर! रोहित, विराटला फटका, तर पंतचं नशीब फळफळलं
आयसीसी कसोटी रँकिंग जाहीर झाली असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा फटका बसला आहे. तर वर्षेभर टीमबाहेर असलेल्या पंतने मोठी उडी घेतलीये.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत रोहित अँड कंपनीने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यानंतर बुधवारी आयसीसी कसोटी रँकिंग जाहीर केली आहे. दोन कसोटींमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा बॅटींगमध्ये फेल गेला. या फ्लॉप कामगिरीमुळे रोहित शर्माला आयसीसी क्रमवारीमध्ये झटका बसला आहे. विराट कोहली सामना खेळला नसल्याने त्यालाही याचा फटका बसला आहे. तर गेल्या वर्षभरापासून बाहेर असून ऋषभ पंतला क्रमवारीमध्ये फायदा झाला आहे.
कॅप्टनला फटका
रोहित शर्मा आयसीसी क्रमवारीमध्ये 12 स्थानावरून 13 स्थानी गेला आहे. तर विराट कोहली सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानी फेकला गेला आहे. कसोटीमध्ये कसोटी क्रमवारीमध्ये टॉप 10 फलंदाजांमध्ये विराट कोहली हा एकमेव भारती फलंदाज आहे. जर विराट कोहलीने दोन सामने खेळले असते आणि चमकदार कामगिरी केली असती तर त्याला क्रमवारीध्ये आणखी फायदा झाला असता. तिसऱ्या कसोटीमध्ये विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अजून साशंकत आहे.
ऋषभ पंतला फायदा
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत अपघातामुळे गेल्या वर्षभरापासून मैदानाबाहेर आहे. मात्र आयसीसी क्रमवारीमध्ये त्यालाही मोठा फायद झाला आहे. ऋषभ पंत 13 व्या स्थानावरून 12 व्या स्थानी पोहोचला आहे. सगळ्यांना प्रश्न पडला आहे की संपूर्ण वर्षे क्रिकेट न खेळताही क्रमवारीमध्ये त्याला कसा काय फायदा झाला.
ऋषभ पंत दिसणार मैदानात?
दरम्यान, ऋषभ पंतला आयपीएलसाठी फिट होईल असा विश्वास आहे. पण पण त्याची क्षमता किती असेल याबाबत माहिती नाही. आयपीएल सुरू व्हायला अवघे 6 आठवडे बाकी आहेत. पंतला जर विचारलं बॅटींग करशील की कीपिंगसह बॅटींग तर यावर तो दोन्ही करेल असं उत्तर देईल. हा त्याचा स्वभाव असल्याचं दिल्ली कॅपिटल्सचे कोच पॉन्टिंग यांनी सांगितलं.