Captain | कसोटी टीमसाठी नव्या कॅप्टनची वर्णी, कमी वयात खेळाडूला लागली लॉटरी

Test Team New Captain | वर्ल्डकपनंतर आयपीएलचे वेध सर्वांना लागले आहेत. आयपीएलनंतर टी-२० वर्ल्ड कप 2024 असल्याने त्याच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. अशातच युवा खेळाडूवर संघाने विश्वास दाखवला असून त्याला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

Captain | कसोटी टीमसाठी नव्या कॅप्टनची वर्णी, कमी वयात खेळाडूला लागली लॉटरी
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 6:05 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 नंतर आता आयपीएलची लगबग सुरू झाल्याचं दिसत आहे. हार्दिक पंड्या मुंबईत परतल्यानंतर गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे देण्यात आली आहे. कमी वयात गिलकडे मोठी जबाबदारी आली असून त्याने व्यवस्थित सांभाळली तर भविष्यात याचा मोठा फायद होऊ शकतो. अशातच क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही एका युवा खेळाडूकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेशचा युवा नजमुल हुसेन शांतो आहे. आजपासून सुरू झालेल्या बांगलदेश आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यामध्ये नजमुल हुसेन शांतो कॅप्टन आहे. याआधी शांतोने कसोटामध्ये कर्णदारपदाची भूमिका निभावली नाही. आताच झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये शांता याने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. या दोन कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशचे मोठे खेळाडू शाकिब अल हसन, लिटन दास हे खेळत नाहीयेत.

शांतोने आपल्या नेतृत्त्वाखाली चांगली कामगिरी केली तर बांगलादेश टीम मॅनेजमेंट त्याला कर्णधार म्हणून पाहू शकतं. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये बांगलादेशने अवघा एक सामना जिंकला आहे. त्यामुळे युवा कर्णधारासाठी मोठी संधी असणार आहे.

कसोटीसाठी न्यूझीलंड संघ:

टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, केन विलियम्सन, विल यू. .

बांगलादेश कसोटीसाठी संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, खालिद अहमद, शहादत हुसैन, हसन मुराद. , नईम हसन, झाकीर हसन.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.