‘मुलाचा जन्म झाला, आता तरी…’, सौरव गांगुलीने रोहित शर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा

रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. असं असताना माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या वक्तव्यामुळे क्रीडाविश्वाच चर्चांना उधाण आलं आहे. 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गांगुलीचं विधान खूपच चर्चेत आलं आहे.

'मुलाचा जन्म झाला, आता तरी...', सौरव गांगुलीने रोहित शर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 9:39 PM

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेसाठी जाणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. कारण त्याच्या घरी पाहुण्याचं आगमन होणार होतं. त्यामुळे सर्व काही संभ्रमात होतं. अखेर 15 नोव्हेंबरला रोहित शर्माच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. रोहित शर्माने याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. ही बातमी वाचून अनेकांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे. पण आता प्रश्न असा आहे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? पण सध्यातरी रोहित जाणारी नाही असंच दिसत आहे. कारण याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे, माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित शर्माला थेट सांगितलं की, पर्थ टेस्ट खेळणं आवश्यक आहे. तसेच त्याच्या एका विधानाने क्रीडाविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरला पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. पण घरात पाहुणा येणार असल्याने रोहित शर्मा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही.

रेवस्पोर्ट्सशी बोलताना सौरव गांगुलीने सांगितलं की, ‘टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाची गरज आहे. तो एक चांगला कर्णधार आहे. आता तर मुलाचा जन्म झाला आहे आणि पर्थ कसोटीसाठी एका आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. आता रोहित शर्मा पर्थला जाऊ शकतो. ही एक मोठी कसोटी मालिका आहे. यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार नाही.’ दरम्यान, रोहित शर्मा पहिला कसोटी खेळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थेट दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियासोबत असणार आहे. दुसरा कसोटी समना 6 डिसेंबरला एडिलेडमध्ये सुरु होणार आहे.

सौरव गांगुलीपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही रोहित शर्माचे कान टोचले होते. त्यांनीही रोहित शर्माला असाच सल्ला दिला होता. गावस्कर यांनी सांगितलं होतं की, न्यूझीलंडविरुद्ध भारताने 3-0 ने मालिका गमावली आहे. त्यामुळे पुढच्या मालिकेत सुरुवातीपासून टीम इंडियासोबत कर्णधार असायला हवा. जर रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नसेल आणि मधेच कुठेतरी मालिकेत येणार असेल तर त्याने संपूर्ण मालिकेत खेळाडू खेळावं. तसेच इतर खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.