“वानखेडेवरील प्रेक्षकवर्ग शांत झाला, पण…”, रोहित शर्माने सांगितलं तेव्हा डोक्यात काय सुरु होतं?

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. पण मधल्या षटकांमध्ये केन विल्यमसन आणि डेरिल मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांनचा चांगलाच घाम काढला. त्यामुळे एक क्षण असं वाटत होतं की सामना दूर जात आहे. पण टीम इंडियाने कमबॅक केलं.

वानखेडेवरील प्रेक्षकवर्ग शांत झाला, पण..., रोहित शर्माने सांगितलं तेव्हा डोक्यात काय सुरु होतं?
वानखेडेवर अचानक भयाण शांतता परसली! रोहित शर्माने सांगितलं तेव्हा नेमकं काय झालं?
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 11:20 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडने चिवट खेळी केली. भारताने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात सर्वबाद 327 धावा करू शकला. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दोन वेळा विजय, तर एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आता टीम इंडियाकडे आयसीसी चषकांचा गेल्या दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. 2013 मध्ये टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तर 12 वर्षांपूर्वी 2011 वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा टीम इंडियाला जेतेपदाची संधी आहे. रोहित शर्माच्या टीम इंडिया जेतेपद जिंकेल? अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे. तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर रोहित शर्माने आपलं मत व्यक्त केलं आहे.

“आम्ही इथे खूप सारं क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे हे मैदान तुम्हाला शांत बसू देत नाही. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं प्लान आखणं गरजेचं असतं. मला माहिती आहे आमच्यावर दबाव होता. आम्ही मधल्या षटकात घसरलो होतो, पण तरीही आम्ही शांत होतो. पण आम्ही करून दाखवलं आणि सामना जिंकला. जेव्हा रनरेट 9 च्या वर होता तेव्हा तुम्हाला चान्स घेणं गरजेचं असतं. त्यांनी आम्हाला ती संधी दिली.  पण ती आम्हाला घेता आली नाही. मिचेल आणि केननं चांगली फलंदाजी केली. पण आम्ही एकदम शांत होतो.”, असं रोहित शर्मा म्हणाला.

“न्यूझीलंडच्या फलंदाजीमुळे प्रेक्षक वर्ग शांत झाला होता. पण खेळाचा नियमच आहे. आम्हाला त्यांच्याकडून सामना खेचून आणायचा होता. अय्यरने या सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्यामुळे मी खूश आहे. गिलही चांगला खेळला पण क्रॅपमुळे परतावं लागलं. कोहलीने नेहमीप्रमाणे चांगली खेळी केली. मी असं म्हणणार नाही की, कोणताही दबाव नव्हता. पण मागच्या नऊ सामन्यात आम्ही जे केलं तेच करायचं होतं.”, असं रोहित शर्मा पुढे म्हणाला.

भारताचा अंतिम फेरीत सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत भारताशी लढणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.