Video : वनडे वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची कुटुंबियांनी केली घोषणा, नेमकं काय झालं ते पाहा
NZ ODI World Cup Team : वनडे वर्ल्डकप 2023 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेसाठी संघांची घोषणा होत आहे. दुसरीकडे न्यूझीलंड संघाने अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा केली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धे 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ असून रॉबिन राउंडने स्पर्धा पार पडणार आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 9 सामने खेळणार आहे. त्यापैकी चार संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. तसेच अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह पाच संघांनी खेळाडूंची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे. आता 2019 वर्ल्डकपमध्ये उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंड संघाने खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. पण संघाची घोषणा अनोख्या पद्धतीने केल्याने आता कौतुक होत आहे. शक्यतो संघाची घोषणी कर्णधार, निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीत होते. पण न्यूझीलंड संघाची घोषणा कुटुंबियांनी केली. आई, पत्नी आणि मुलांनी खेळाडूंची नावं जाहीर केली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून क्रीडाप्रेमी कौतुक करत आहेत.
न्यूझीलंड संघाची घोषणा कशी झाली?
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याच्या नावाची घोषणा पत्नी आणि मुलांनी केली. यावेळी त्याचा कॅपचा नंबर सांगितला गेला. ट्रेंट बोल्टच्या मुलांनी वडिलांचं नावं घेतलं. मार्क चॅपमॅन, डेवन कॉनवे, मॅट हॅनरी, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्सस, मिचेल सँटरन, इश सोढी, डॅरेल मिचेल यांच्या घरच्यांनी त्याचं नावं जाहीर केली. तर टीम साउदीच्या मुलींनी वडिलांच्या नावाची घोषणा केली. जिम्मी नीशम याच्या आजीने वर्ल्डकप संघात असल्याचं सांगितलं. त्यामुळे या अनोख्या पद्धतीचं आता सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Our 2023 @cricketworldcup squad introduced by their number 1 fans! #BACKTHEBLACKCAPS #CWC23 pic.twitter.com/e7rgAD21mH
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 11, 2023
वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ उपविजेता ठरला. अतितटीच्या सामना दोन वेळा सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला. मात्र हा सामनाही बरोबरीत सुटल्याने चौकारांच्या गणनेवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात 5 ऑक्टोबरला पहिला सामना होणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यासोबत न्यूझीलंडही जेतेपदाच्या शर्यतीत आहे.
विलियमनसन फिट अँड फाईन
न्यूझीलंडच्या संघात केन विलियमसन याचं पुनरागमन झालं आहे. आयपीएलमध्ये झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मायदेशी परतला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी फीट होईल. त्यामुळे टॉम लॅथम याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. ट्रेंट बोल्ट आणि डग ब्रेसवेल यांचीही संघात वर्णी लागली आहे.
न्यूझीलंडचा संपूर्ण संघ : केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेवन कॉनवे, लोकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिम्मी नीश, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, इश सोढी, टिम साउदी आणि विल यंग.