Asia Cup 2023 : कोहली आणि रोहित यांच्यात कोणत्या बाबींवर होते चर्चा, खुद्द हिटमॅनने केला खुलासा

Rohit Sharma And Virat Kohli : आशिया कप स्पर्धा सुरु असून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी या दोघांमध्ये मैदानात आणि मैदानाबाहेर कशी चर्चा होते, याबाबत खुद्द हिटमॅनने खुलासा केला आहे.

Asia Cup 2023 : कोहली आणि रोहित यांच्यात कोणत्या बाबींवर होते चर्चा, खुद्द हिटमॅनने केला खुलासा
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 4:11 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धा सुरु असून सुपर 4 फेरीसाठी लढत सुरु आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली सपशेल फेल ठरले होते. शाहीन आफ्रिदीने या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे चुकांमधून शिकत पुढच्या सामन्यात या दोघांची रणनिती कशी असेल? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. रविवारी कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. विराट कोहली याच्यासोबत कसे संबंध आहेत याबाबतही त्याने सांगितलं. तसेच ऋषभ पंतबाबतही आपलं मत जाहीर केलं आहे.

काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा?

“मी आणि विराट कोहली फलंदाजीबाबत, टीमबाबत, विरोधी टीम आणि गोलंदाजीबाबत चर्चा करतो. आम्ही प्रत्येक मालिकेतून काही ना काही शिकतो.” असं रोहित शर्मा म्हणाला. “भारतीय संघाने 2020-21 मध्ये गाबामध्ये कसोटी सामना जिंकलो. तो सामना माझ्या मते आतापर्यंत खेळलेला सर्वोत्कृष्ट सामना होता.”, असंही रोहित शर्मा याने पुढे सांगितलं.

गेलचा तो रेकॉर्ड मोडायचा आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्रिस गेलने सर्वाधिक षटकार मारण्यचाचा विक्रम केला आहे. मात्र हा विक्रम मोडण्याची नामी संधी रोहित शर्माकडे आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यात 553 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर रोहित शर्मा याचा नंबर लागतो. त्याने 446 आंतरराष्ट्रीय सामन्यात 539 षटकार मारले आहेत. “जर असं झालं तर माझ्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांची नोंद होईल. मी माझ्या आयुष्यात कधीच असा विचार केला नव्हता. माझ्या नावावर सर्वाधिक षटकार मारण्याची नोंद होउ शकतो. मी ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडेल हे अद्भुत असेल.”, असंही रोहित शर्मा म्हणाला.

ऋषभ पंतबाबत रोहित शर्मा याने व्यक्त केलं असं मत

कर्णधार रोहित शर्मा याने ऋषभ पंत याच्या बाबतही आपलं मत व्यक्त केलं आहे. “त्याने आपल्या करिअरमध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं आहे, मला असं वाटतं त्याने तसंच खेळत राहावं. त्याने आपल्या मानसिकतेत कोणताही बदल करू नये. तो एकाच पद्धतीने खेळतो असं नाही. तो संघाची स्थिती पाहून खेळतो हे विशेष आहे.”, असं रोहित शर्मा म्हणाला.

'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.