ODI WC 2023 : गेल्या चार वर्षात टीम इंडियात फक्त इतकाच बदल, 2019 वर्ल्डकप आणि आताच्या संघातील फरक

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. गेल्या 10 वर्षात भारतीय संघाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळे यंदा भारतीय संघाकडून खूपच अपेक्षा आहेत.

ODI WC 2023 : गेल्या चार वर्षात टीम इंडियात फक्त इतकाच बदल, 2019 वर्ल्डकप आणि आताच्या संघातील फरक
ODI WC 2023 : वनडे वर्ल्डकप 2019 नंतर आताच्या संघात तेच 8 खेळाडू, जाणून किती बदलली टीम इंडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 5:56 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे. वनडे विश्वचषक भारतात असल्याने टीम इंडियाकडून अपेक्षा आहेत. 12 वर्षानंतर वनडे वर्ल्डकप जिंकण्याची संधी असणार आहे. तर गेल्या दहा वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्यासाठीही टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या वनडे वर्ल्डकपपासून टीम इंडियात किती बदल झाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चार वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये वर्ल्डकप झाला होता. यावेळी टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली होती मात्र न्यूझीलंडने पराभूत करत भारतीयांचं स्वप्न धूळीस मिळवलं. 2019 आणि 2023 वर्ल्डकपची तुलना टीम इंडियामध्ये नेमका फरक काय हे कळून येईल.

गेल्या 4 टीम इंडियात किती बदल?

वनडे वर्ल्डकप 2023 साठी निवडलेल्या संघात 8 खेळाडू असे आहेत की त्यांनी 2019 चा वर्ल्डकप खेळला आहे. 2019 च्या वनडे वर्ल्डकप संघात विराट कोहली कर्णधार होता. तर रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि विजय शंकर यांचा समावेश होता. या संघातील सात जण 2023 वर्ल्डकप संघात पुन्हा दिसणरा आहेत. रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

2019 वनडे वर्ल्डकपमध्ये शिखर धवन आणि विजय शंकर संघात होते. मात्र दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले . तसेच धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान मिळालं होतं. महेंद्रसिंह धोनी निवृत्त झाला आहे. तर ऋषभ पंत दुखापतीमुळे संघात नाही. केदार जाधव फॉर्म गमावल्याने बाहेर आहे. भुवनेश्वर कुमार जानेवारी 2022 पासून एकही वनडे खेळला नाही. त्याच्या गोलंदाजीची धार कमी झाल्याचं गेल्या वर्षात दिसून आलं आहे. दिनेश कार्तिकचं करिअर जवळपास संपुष्टात आलं आहे. मयंक आणि शिखर दोघांना संघात पुन्हा स्थान मिळेल ही शक्यता कमी आहे.

हे खेळाडू पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप खेळणार

टीम इंडियासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय खेळाडूंमध्ये सात खेळाडू पहिल्यांदाच खेळणार आहेत. यात शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज आहे.

हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.