गेल्या 6 मोसमात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने पटकावले जेतेपद, आज काय होणार?

| Updated on: Jun 29, 2024 | 8:53 PM

T20 World cup final : भारत आणि दक्षिण आफ्रिया यांच्यात आज फायनल सामना होत आहे. भारताची सुरुवात खुपच खराब झालीये. भारताने आज टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पण मागील काही फायनल सामने पाहिले तर टॉस जिंकणाऱ्या संघानेच जेतेपद पटकावले आहे.

गेल्या 6 मोसमात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने पटकावले जेतेपद, आज काय होणार?
Follow us on

T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाहीये. T20 विश्वचषकाच्या मागील 6 हंगामात, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे या वेळी भारत जेतेपद जिंकेल. कारण मागील ट्रेंड तेच दर्शवत आहेत.

भारताला पहिले 3 झटके लवकर लागले आहेत. रोहित शर्माने 5 बॉलमध्ये 9 रन केले. पंत शुन्यावर बाद झाला. तर सुर्यकुमार यादव याने फक्त 3 रन केले.

गेल्या 6 मोसमात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने विजेतेपद पटकावले

T20 विश्वचषक स्पर्धेचा हा 9वा हंगाम आहे. स्पर्धेचे पहिले दोन हंगाम वगळता 2012 ते 2022 या कालावधीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. 2024 मध्ये भारताने देखील नाणेफेक जिंकली आहे. त्यामुळे भारत विजेतेपद मिळवेल का? नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, कारण खेळपट्टी चांगली दिसत आहे. आमच्यासाठी ही मोठी संधी असून शांत राहून चांगले खेळणे महत्त्वाचे आहे. दक्षिण आफ्रिका देखील चांगला संघ आहे आणि त्यांनीही आतापर्यंत चांगला खेळ केला आहे.

2010 – नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकला
2012 – नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकला
2014 – नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकला
2016 – नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकला
2021 – नाणेफेक जिंकणारा संघ, सामना जिंकला
2022 – नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकला

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.