भारत बांग्लादेश सामन्यात पावसाची दाट शक्यता, टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित फिस्कटणार!

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताचा दुसरा सामना बांग्लादेशसोबत होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने धाकधूक वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे गणित फिस्कटू शकतं. हा सामना अँटिग्वा येथे होणार आहे. भारताचं उपांत्य फेरीचं गणित यामुळे फिस्कटू शकते.

भारत बांग्लादेश सामन्यात पावसाची दाट शक्यता, टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित फिस्कटणार!
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 8:10 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना भारत बांग्लादेश यांच्यात होणार आहे. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात काही गडबड झाली तर पुढचं आव्हान ऑस्ट्रेलियाचं असणार आहे. त्यामुळे काहीही करून हा सामना जिंकावाच लागणार आहे. तर बांग्लादेश पराभूत झाला तर शर्यतीतून एक स्पर्धक बाहेर पडेल. पण अँटिग्वा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे हे गणित फिस्कटण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार भारत बांग्लादेश हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरु होईल. तेव्हा भारतातील वेळ रात्री 8 वाजताची असेल. हवामान खात्यानुसार दिवसभरात 23 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. बांग्लादेश ऑस्ट्रेलिया सामन्यातही असंच काहीसं झालं. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 28 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे हे गणित लक्षात ठेवावं लागेल.

जर पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर गुणतालिकेतील सर्वच चित्र बदलून जाईल. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. सामना रद्द झाल्यास भारत बांग्लादेश या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. भारताचे 3 गुण होतील, तर बांगलादेशच्या खात्यात 1 गुण जमा होईल. बांगलादेशचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी, भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. बांगलादेशने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं तर 3 गुण होतील. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर 3 गुण राहतील. अशात नेट रनरेट खूपच महत्त्वाचा ठरेल.

सर विवियन रिचर्ड्स मैदानात आतापर्यंत टी20 वर्ल्डकपचे सहा सामने खेळले गेले. यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 4 वेळा विजय मिळवला आहे. तर धावा रोखण्यात फक्त 2 वेळा यश आलं आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारेल. दुसरीकडे, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममधील सुविधा अधिक चांगल्या आहेत. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर काही वेळातच सामना सुरू होऊ शकतो.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव/ मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

बांग्लादेश : तनजीद हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, तौहीद हृदयॉय, मुहम्मदउल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनजीम हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.

'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.