Sourav Ganguly | “दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास स्वागत”, गांगुलीसाठी भाजपची फिल्डिंग

सौरव गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. राजकीय दबावामुळे गांगुलीला हा हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जात आहे.

Sourav Ganguly | दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास स्वागत, गांगुलीसाठी भाजपची फिल्डिंग
सौरव गांगुलीला गुरुवार 7 जानेवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 6:40 PM

कोलकाता : “दादा बंगालचा वाघ आहे. सौरव गांगुलीवर  (Sourav Ganguly) राजकारणात प्रवेश करण्याबाबत कोणताही राजकीय दबाव नाही. मात्र जर गांगुलीने भाजप प्रवेश केला तर आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करु”, अशी प्रतिक्रिया बंगाल भाजपचे सह प्रभारी अरविंद मेनन (Bjp Arvind Menon) यांनी दिली. गांगुली भाजप प्रवेश करणार का, किंवा त्याच्यावर राजकारणात प्रवेश करण्याबाबत कोणता राजकीय दबाव आहे का, या प्रश्नावर मेनन यांनी ही प्रतिक्रिया दिली. मेनन बुधवारी बर्दवान जिल्ह्यातील कटवामध्ये ‘चाय पे चर्चा’ (Chay Pe Charcha) कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळेस त्यांनी गांगुलीबाबत प्रतिक्रिया दिली. (there was no political pressure on Sourav Ganguly to enter politics Bengal BJP leader Arvind Menon said)

गांगुलीवर राजकीय दबाव होता. तसेच या राजकीय दबावामुळेच गांगुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा CPI (M)चे आमदार अशोक भट्टाचार्य यांनी केला होता. गांगुलीने गेल्या काही दिवसात अनेक राजकीय व्यक्तींना भेटी दिल्या. गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. भाजपशी वाढती जवळीक पाहता गांगुलीला राज्य सरकारने सौरवला दिलेला भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली. सरकारच्या या निर्णयामुळे सौरव तणावात आला. यामुळेच त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा असंही म्हटलं जात आहे.

गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला कोलकात्यातील वुडलॅंड्स रुग्णालयाच दाखल करण्यात आलं. त्यानंतर गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या अॅंजियोप्लास्टीत 1 ब्लॉक काढण्यात आला. तर 2 ब्लॉक बाकी आहेत. मात्र यासाठी नंतर अॅंजियोप्लास्टी करण्यात येणार आहे. दरम्यान आता गांगुलीची प्रकती स्थिर आहे. त्याला आज (6 जानेवारी) देण्यात येणार होता. मात्र गांगुलीने स्व मर्जीने रुग्णालयातील मुक्काम वाढवून घेतला आहे. यामुळे गांगुलीला 7 जानेवारीला डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती वुडलॅंड्स रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

दादाला झटका, कंपनीला फटका

गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर सोशल मीडियावर गांगुलीने केलेली खाद्यतेलाची जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. तुमच्या चांगल्या ह्रदयासाठी खाद्य तेल चांगलं असल्याचं या जाहिरातीत म्हटलं आहे. यामुळे या खाद्यतेलाच्या जाहीरातीवरुन नेटीझन्सने संबंधित कंपनीला चांगलेच ट्रोल केलं आहे. तसेच गांगुलीची खाद्यतेलाची जाहिरात काही काळासाठी थांबवण्यात आल्याचं वृत्तही समोर येत आहे.

गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा

गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. या आजारामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. योग्य आणि सुरळीतपणे रक्तपुरवठा न झाल्याने गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

संबंधित बातम्या :

सौरव गांगुलीच्या हार्ट अटॅकचं राजकीय कनेक्शन?

Sourav Ganguly | दादाला झटका, कंपनीला फटका, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर ऑईल कंपनीची जाहिरात मागे

Sourav Ganguly | सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत दुसरी मोठी शक्यता, दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी होणार?

Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

(there was no political pressure on Sourav Ganguly to enter politics Bengal BJP leader Arvind Menon said)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.