IND vs AUS 4th T20 | …तर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात झाली असती बत्तीगुल ? काय आहे प्रकरण

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या चौथा टी 20 क्रिकेट सामन्याबाबत मिडीयात उलट सुलट बातम्या आल्याने अनिश्चितेचे सावट होते. छत्तीसगडच्या रायपूर क्रिकेट सामन्यासाठी तात्पुरता वीज पुरवठा करुन सामना खेळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

IND vs AUS 4th T20 | ...तर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात झाली असती बत्तीगुल ? काय आहे प्रकरण
IND vs AUS 4th T20Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 2:06 PM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान रायपूर येथील शहीद वीर नारायण इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 1 डिसेंबर रोजी पाच सामन्यांच्या टी – 20 क्रिकेट मालिकेतील चौथा सामना भारताने जिंकत मालिकाही खिशात घातली. परंतू या स्टेडियमचं तब्बल 3 कोटीचं वीज बिल राज्य सरकारने गेली अनेक वर्षे भरलं नसल्याचं उघडकीस आले आहे. त्यामुळे हा सामन्यावर गंभीर संकट ओढवले होते. जनरेटर लावून फ्लर्ड लाईट सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावर शेवटच्या क्षणापर्यंत मॅच होईल की नाही अशा संशयाच्या भोवऱ्यात ही मॅच झाल्याचे उघडकीस आले आहे.

छत्तीसगढ येथील रायपूर क्रिकेट स्टेडियमला कायम स्वरुपी वीजपुरवठा नसल्याचे उघड झाले आहे. या मैदानाचे तीन कोटी रुपयाचं वीज बिल अनेक वर्षांपासून भरले नसल्याचे उघड झाले आहे. याचा तेथील क्रिकेट सामन्यांवर काही परिणाम होत नाही, कारण छत्तीसगढ राज्य क्रिकेट संघ जेव्हा गरज लागेल तेव्हा छत्तीसगढ राज्य विद्युत वितरण कंपनी लि. कडून तात्पुरते वीज कनेक्शन घेऊन मॅच भरवित वेळ मारून नेते. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी 20 मॅचवरही त्यामुळे अनिश्चितेचे सावट होते. या संदर्भात मिडीयात उलटसुलट बातम्या आल्या होत्या. यावर स्टेडीयम निर्माण समितीच्या आवाहनानंतर 2010 मध्ये स्टेडियममध्ये वीज कनेक्शन देण्यात आले होते. 2018 पर्यंत प्रलंबित वीज बिल 3.16 कोटी रुपयांपर्यंत पोहचलं आहे. त्यानंतर वीज कनेक्शन कापल्याचे छत्तीसगढ राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे ( CSPDCL ) अभियंता अशोक खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

यानंतर क्रिकेट स्टेडियम प्राधिकरणाने 200 केव्हीएने अस्थायी कनेक्शनसाठी अर्ज केला होता. येथे प्रेक्षक क्रिकेटचे सामने पाहायला येत असल्याने आयत्यावेळी तात्पुरते कनेक्शन देण्यात आले. शुक्रवारच्या मॅचसाठी देखील छत्तीसगड राज्य क्रिकेट अस्थायी कनेक्शन घेतले आणि कंपनीकडे दहा लाख रुपये भरले अशी माहीती खंडेलवाल यांनी दिली. आम्ही प्रलंबित वीज बिलासाठी राज्य क्रीडा आणि युवक कल्याण विभागाला नोटीस पाठविली आहे. विभागाने बजेटमध्ये तरतूद केली नसल्याचे सांगितले होते. अलिकडेच विभागाने सर्व प्रलंबित बिले भरण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

येथे पहा ट्वीट –

जनरेटरचा वापर यासाठी केला ?

क्रिकेट असोसिएशनकडे स्टेडीयमची मालकी नाही. राज्य सरकारकडे त्याची मालकी आहे. त्याचा खर्च क्रीडा आणि युवक कल्याण खात्याकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे त्याची जबाबदारी येत नसल्याचे छत्तीसगड राज्य क्रिकेट संघाचे अध्यक्ष जुबीन शाह यानी म्हटले आहे. अस्थायी वीज कनेक्शन शिवाय आमच्याकडे अतिरिक्त पर्याय आहेत. आधीही येथे अशाच प्रकारे मॅच झाल्या होत्या. स्टेडियममध्ये फ्लर्डलाईट जनरेटरवर सुरु होत्या. कारण अचानक वीज गेली तर जनरेटर सुरु करण्यासा अर्धा तास लागतो असेही शाह यांनी सांगितले.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.