IND vs AFG : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील बेस्ट, जाणून घ्या सर्वकाही
Asian Games 2023, IND vs AFG : एशियन गेम्स 2023 स्पर्धेत पुरुष क्रिकेट गटात सुवर्ण पदकासाठी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात हे 11 खेळाडूंच्या कामगिरीवर नजर असेल. चला जाणून घेऊयात याबाबत
मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेत भारताने गेल्या 72 वर्षातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. हॉकी, महिला क्रिकेटसह काही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. आता पुरुष क्रिकेट संघांची सुवर्ण पदकासाठी लढाई होणार आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या स्पर्धेत भारताने नेपाळ आणि बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे या सामन्यात भारताची पारडं जड मानलं जात आहे. चीनच्या हांग्जो येथील झेजेयुटी मैदानावर हा सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे. सकाळा 11.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या 11 खेळाडूंवर नजर असेल. हे खेळाडू तुमच्या नशिबाचं दार उघडू शकतात.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 4 टी20 सामने झाले आहेत. या चार पैकी चार सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच भारताची या स्पर्धेतील कामगिरी चांगली राहिली आहे. नेपाळ विरुद्धच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल चमकला होता. त्याने 49 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने आक्रमक खेळी केली होती. त्याने 26 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी केली. भारताने नेपाळ विरुद्धचा सामना 23 धावांनी जिंकला. तर बांगलादेश विरुद्ध 9 गडी राखून विजय मिळवला. पण कधी कोणता खेळाडू चमकेल सांगता येत नाही. त्यामुळे योग्य खेळाडूंची निवड करणं गरजेचं आहे.
दोन्ही संघातील 11 खेळाडू ठरतील बेस्ट
- विकेटकीपर- मोहम्मद शाहजाद
- फलंदाज- नूर अली, रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा (कर्णधार)
- अष्टपैलू – गुलबदीन नायब (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर
- गोलंदाज- कैस अहमद, रवि साई किशोर, रवि बिश्णोई
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : यशस्वी जायसवाल, ऋतुराज गयाकवाड़ (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, साई किशोर, अर्शदीप सिंह, रवि बिश्णोई
अफगाणिस्तान : सेदिकुल्लाह अटल, मोहम्मद शाहज़ाद (विकेटकीपर), नूर अली, शाहिदुल्ला, अफसर जजई, करीम जनत, गुलाबदीन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अशरफ, फरीद अहमद, जहिर खान, कैस अहमद.