SA vs NED : दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील बेस्ट, पॉइंटच्या गणितात ठरू शकतात लकी
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 15 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड आहे. असं असलं तरी नेदरलँडचे काही खेळाडू चांगली छाप पाडतील यात शंका नाही.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि अफगाणिस्तान सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाल. त्यामुळे कधी कोणता सामना कसा फिरेल सांगता येत नाही. त्यामुळे दुबळ्या संघांना कमकुवत समजणं मोठी चूक ठरेल. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली आहे. सुरुवातीचे दोन सामने मोठ्या फरकाने जिंकत 4 गुणांसह नेट रनरेटमध्ये चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही मोठ्या फरकाने जिंकण्यासाठीच दक्षिण आफ्रिका संघ उतरेल. वर्ल्डकपमध्ये दुबळा समजला जाणारा नेदरलँडचा संघही काही कमी नाही. पण सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभवाची धूळ पचवावी लागली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं मोठं आव्हान असणार आहे.
पिच रिपोर्ट
धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनंच स्टेडियम फलंदाजीसाठी पुरक आहे. वेगवान गोलंदाजांना काही अंशी सीम आणि स्विंगला मदत होईल. त्यामुळे फलंदाजांना काही अडचण येऊ शकते. पण काही षटकं खेळल्यानंतर फलंदाजासाठी उत्तम ठरेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल. पहिल्या डावात अंदाजे 266 ते 280 धावा होण्याची शक्यता आहे.
लकी प्लेयर्स
क्विंटन डिकॉक सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मागच्या दोन सामन्यात त्याने कमाल केली आहे. एडन मार्करम हा देखील रंगात असून त्यानेही जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. तर बास डी लीडे यानेही आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे हे खेळाडू कर्णधारपदासाठी उत्तम ठरतील. तर कगिसो रबाडा, रस्सी व्हॅन दर डुसेन, हेन्रिक क्लासेन खेळाडू टॉप पिकमध्ये असतील. तर मार्को जानसेन, कोलिन अकरमॅन आणि केशव महाराज हे बजेट खेळाडू ठरतील. मॅक्स ओडाउड आणि तेजा निदामनुरू या खेळाडू घेणं टाळलेलं बरं राहील.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका : रस्सी व्हॅन दर डुसेन, टेम्बा बावुमा, डेविड मिलर, एडन मार्करम, मार्को जानसेन, क्विंटन डीकॉक, हेन्रिक क्लासेन, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, कगिसो रबाडा, केशव महाराज
नेदरलँड : मॅक्स ओडाऊड, बास दी लीडे, सायब्रँड झुलफिकर, कोलीन अकरमॅन, कायल क्लेन, विक्रमजीत सिंग, रोलेफ व्हॅन दर मर्वे, स्कॉट एडवर्ड्स, पॉल वॅन मीकेरन, तेजा निदामनुरू.