ENG vs SA : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात हे 11 खेळाडू नशिब पालटतील! जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
World Cup 2023, ENG vs SA : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघात जबरदस्त खेळाडू असून कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. असं असलं तरी 11 खेळाडूंची या सामन्यावर छाप असणार आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 20 वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दिग्गज संघात होत आहे. या दोन्ही संघांना दुबळ्या संघांनी पराभवाची धूळ चारली आहे. इंग्लंडला अफगाणिस्तानकडून, तर दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडकडून पराभव सहन करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत दमदार सुरुवात केली. पण चोकर्सचा डाग असलेल्या दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात माती केली. पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास खालावला आहे. तर इंग्लंडची परिस्थिती काही वेगळी नाही. इंग्लंडने 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, स्वप्नपूर्तीसाठी खेळाडूंची निवड करणं ही परीक्षाच असणार आहे.
पिच रिपोर्ट
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हे मैदान छोटं आहे. पण फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना मदत करणारं आहे. सुरुवातीची काही षटकं फलंदाजांना सांभाळून खेळावं लागणार आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ आरामात 300 च्या पार धावा करू शकतो. पण वानखेडेवर 23 आंतरराष्ट्रीय सामन्यापैकी 11 सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल.
हे खेळाडू ठरतील बेस्ट
- कर्णधार: एडन मार्करम
- उपकर्णधार: डेविड मलान
- विकेटकीपर: क्विंटन डी कॉक, जोस बटलर
- बॅटर: डेविड मलान, जो रूट, एडन मार्करम, डेविड मिलर
- अष्टपैलू: केशव महाराज, ख्रिस वोक्स
- गोलंदाज : रीस टॉपली, कगिसो रबाडा, आदिल रशीद
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार/ विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियम लिविंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टॉपली
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी वॅन डर डुसेन, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को जेनसेन, केशव महाराज, गेराल्ड कोट्जी, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी