PAK vs BAN : पाकिस्तान बांगलादेश सामन्यात हे खेळाडू करतील स्वप्नपूर्ती! पॉइंट्सची गणितं आणि इतर बाबी जाणून घ्या

World Cup 2023, PAK vs BAN : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना मंगळवारी रंगणार आहे. दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? इथपासून गणितं आहे. असं असलं तरी दोन्ही संघातील महत्त्वाच्या 11 खेळाडूंवर नजर असणार आहे.

PAK vs BAN : पाकिस्तान बांगलादेश सामन्यात हे खेळाडू करतील स्वप्नपूर्ती! पॉइंट्सची गणितं आणि इतर बाबी जाणून घ्या
PAK vs BAN : पाकिस्तान बांगलादेश सामन्यात हे खेळाडू करतील स्वप्नपूर्ती! पॉइंट्सची गणितं आणि इतर बाबी जाणून घ्या
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 4:14 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. कारण उपांत्य फेरीसाठी संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. बांगलादेश आणि इंग्लंड या दोन संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे भारत सोडून इतर 7 संघांमध्ये उपांत्य फेरीची चुरस पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश सामना याच कारणासाठी महत्त्वाचा आहे. बांगलादेशचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी पाकिस्तानची वाट बिकट करू शकते. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानात खेळला जाणार आहे. पाकिस्तानने स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकले होते. त्यानंतर सलग 4 सामने गमवल्याने उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा म्हणण्यापेक्षा अब्रू वाचवण्यासाठी असेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी धडपड करतील. या सामन्यात दोन्ही संघांतील निवडक 11 खेळाडू छाप सोडतील. चला जाणून घेऊयात प्लेइंग 11, पिच रिपोर्ट आणि इतर बाबी…

पिच रिपोर्ट

कोलकात्याचं ईडन गार्डन मैदानात गोलंदाजांना मदत मिळते. फलंदाजांनी या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागू लागू शकतो. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ अनेकदा अडचणीत आला आहे. कारण दव पडल्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण होतं. तसेच फलंदाजांना आवश्यक अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं सोपं होतं. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल.

या खेळाडूंवर असेल नजर

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीवर नजर असेल. बाबरला फॉर्म गवसला नसल्याने त्याच्याकडून अपेक्षा करायच्या की नाही हा देखील प्रश्न आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी चांगली कामगिरी करू शकतो. बांगालदेशकडून अष्टपैलू शाकिब अल हसन याच्याकडे नजर असेल.

संभाव्य ड्रीम 11 टीम

  • कर्णधार- मोहम्मद रिजवान
  • उपकर्णधार-शाहीन अफरीदी
  • विकेटकीपर-मुश्फिकुर रहीम
  • अष्टपैलू-इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाकिब अल हसन
  • फलंदाज- लिटन दास, तन्जीद हसन, इमाम उल हक,
  • गोलंदाज-शोरिफुल इस्लाम, हारिस रऊफ

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.

बांगलादेश : तन्जीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराझ, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, तन्झिम हसन साकिब.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.