IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यात या खेळाडूंकडे असेल नशिबाची किल्ली! जाणून घ्या कोण आहेत ते

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरु होत आहे. टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. या मालिकेतून वर्ल्डकपसाठी खेळाडूंची निवड करणं सोपं होणार आहे. दुसरीकडे, खेळाडूंच्या भरवश्यावर बसलेल्यांना स्वप्नपूर्तीसाठी खेळाडूंची आकडेवारी फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊयात कोणते खेळाडू नशिबाचं दार उघडतील ते..

IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यात या खेळाडूंकडे असेल नशिबाची किल्ली! जाणून घ्या कोण आहेत ते
IND vs SA : भारत दक्षिण अफ्रिका सामन्यात हे खेळाडू करतील मालामाल! स्वप्नपूर्तीसाठी निवड ठरू शकते बेस्ट
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 4:00 PM

मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला होणार आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही दुसरी टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 4-1 ने जिंकली होती. आता दक्षिण अफ्रिकेत त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. हार्दिक पांड्या जखमी आणि रोहित शर्माने काही दिवसांचा आराम मागितल्याने टी20 धुरा सूर्यकुमार यादव याच्याकडे आली आहे. ही मालिका टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वर्ल्डकप संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. असं असताना पहिल्या टी20 सामन्यात कोणते खेळाडू वरचढ ठरतील? तसेच पॉइंट्सच्या गणितात कोण सरस ठरेल? कर्णधार उपकर्णधारासाठी कोण योग्य ठरेल? ते जाणून घेऊयात.

या खेळाडूंवर असेल नजर

पहिल्या टी20 सामन्यात कोणता खेळाडूचं नशिब चमकेल सांगता येत नाही. पण मागच्या आकडेवारीवरून आणि फॉर्मवरून एक अंदाज बांधता येईल. सलामीचे फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या फलंदाजीवर लक्ष असेल. दोघांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. या व्यतिरिक्त रिंकू सिहं आणि रवि बिश्नोई हे देखील चांगल्या फॉर्मात आहेत. तसेच संघाला गरजेवेळी तारण्याची ताकद श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यात आहे. चला जाणून घेऊयात अंदाजे कोणती टीम फायदेशीर ठरू शकते ते..

संभावित ड्रीम 11

  • कर्णधार- सूर्य कुमार यादव
  • उपकर्णधार-रीजा हेंड्रिक्स
  • विकेटकीपर- इशान किशन
  • अष्टपैलू-मार्को यानसेन, रविंद्र जड़ेजा, एडेन मार्करम
  • फलंदाज- ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर
  • गोलंदाज-तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी, रवि बिश्नोई

पिच रिपोर्ट

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला टी20 सामना दक्षिण अफ्रिकेतील डरबन येथे खेळला जाणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजांसाठी एकदम मस्त आहे. खेळपट्टीत थोडा ओलावा असल्याने चेंडूला बऱ्यापैकी उसळी मिळते. फिरकीपटूंना हवा तसा फायदा होणार नाही. पण वेगवान गोलंदाज चमकदार कामगिरी करू शकतात.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.