हाच तुझा खरा फॉर्म, विराटवर नेटिझन्सचा संताप
विराट कोहली पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. यापूर्वी देखील तो नेटिझन्सकडून ट्रोल झाला होता. आशिया चषकात केल्या कामगिरीनंतर विराटकडून आशा वाढल्या होत्या. पण, निराशाच हाती आली.
नवी दिल्ली : तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील (India vs Australia 1st t20) पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु आहे. यात उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) अव्वल स्थानावर आहे. त्यानं धडाकेबाज कामगिरी केली असून रोहित शर्मानं (Rohit Sharma) देखील विक्रम केलाय. तर दुसरीकडे विराटनं दोन धावा करून आऊट झाला. विराटनं केलेल्या घोर निराशेमुळे तो नेटिझन्सच्या चांगलाच निशाण्यावर आला आहे.
विराट कोहली ट्रोल
??@imVkohli #INDvsAUS pic.twitter.com/0CNutUyv3K
— Hemant Singh (@Hemant18327) September 20, 2022
नेटिझन्सनं यावेळी टीका करताना इमोजींचा देखील वापर केलाय. तर यावेळी विराटवर चांगलीच टोलेबाजी झाल्याचं दिसतंय.
नेटिझन्स संतापले
King kohli back in form…..: pic.twitter.com/iJ1hmE2W9R
— Mangesh Khedikar (@MrKhedikar) September 20, 2022
काही असेही ट्विट
rohit kohli back in form ?
— legb4jimmy (@latenightsidea) September 20, 2022
आयपीएलमध्येही संताप
विराट कोहलीची आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी पाहून त्यावेळी देखील नेटिझन्सनं त्याला फैलावर घेतलं होतं. यावेळी विराटवर वेगवेगळ्या मिम्स व्हायरल झाल्या. यानंतर आता दुसऱ्यांदा विराट ट्रोल होतोय.
दोन धावा करून बाहेर
ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजी दिलीय. यात विराट कोहली हा फक्त दोन धावा काढून माघारी परतला आहे. पाचव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूत नाथन एलिकच्या चेंडूवर विराट आऊट झालाय. यावेळी कोहलीची विकेट कॅमरुन ग्रीननं घेतली. विराट कोहलीनं घोर निराशा केल्याचं चाहते म्हणताना दिसतायत.
रोहित ठरला षटकारांचा किंग
रोहितनं मार्टिन गप्टिलसारखाच T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. मार्टिन गप्टिलच्या नावावर T20I क्रिकेटमध्ये 172 षटकार आहेत. आता रोहितच्या नावावरही 172 षटकार झाले आहेत.