IND vs SA: हा खेळाडू ठरू शकतो ड्रिम इलेव्हनचा एक्का! नशिबाची बाजी पालटण्याची ताकद
टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने टीम इंडियाचा दक्षिण अफ्रिका दौरा खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापासून भारतीय खेळाडूंना दम दाखवावा लागणार आहे. पण दक्षिण अफ्रिकेला त्यांच्याच धरतीवर पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. या संपूर्ण सामन्यात अष्टपैलू खेळाडूंवर नजर असणार आहे.
मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन टी२० सामन्यांची मालिका होत आहे. ही मालिका भारताला टी२० वर्ल्डकप २०२३ च्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेकडे संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष लागून आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर आता तशी कामगिरी या मालिकेतही असेल का? असा प्रश्नही क्रीडारसिकांना पडला आहे. असं असताना दुसरीकडे कोट्यधीश होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक जण प्रयत्न करत असतात. या सामन्यातून तरी आपलं स्वप्न पूर्ण होईल का? अशी आशा बाळगून असतात. पण सर्वांना नशिबाची साथ मिळेल असं होत नाही. लाखो लोकांमध्ये एखाद्याचं नशिब पालटतं. त्या दिवशी तो खेळाडू खेळेल आणि पॉइंट्सच्या गणितात बसणारे खेळाडू असले की झालंच समजा. त्यामुळे तसा अंदाज बांधणं खूपच कठीण आहे. पण मागच्या आकडेवारी एखाद्या फॉर्म कामी पडू शकतो. पण तोही पत्ता चालेल की नाही याबाबत शंकाच आहे. तरी एका अंदाजावरून खेळाडूंच आकलन करणं सोपं होतं.
टी२० हा मर्यादीत २० षटकांचा फॉर्मेट आहे. त्यामुळे धावा आणि विकेट याचं गणित जुळून येणं गरजेचं आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू सर्वाधिक गुण मिळवून देतील असा साधारण अंदाज असतो. त्यामुळे मार्को यानसेन, रविंद्र जडेजा आणि एडन मार्करम या खेळाडूंपैकी एकाची निवड कर्णधार म्हणून करू शकता. पण सरतेशेवटी निवड तुम्हालाच करायची आहे. हा निव्वळ अंदाज आहे.
संभावित ड्रीम 11
- कर्णधार- मार्को यानसेन
- उपकर्णधार- एडेन मार्करम
- विकेटकीपर- इशान किशन
- अष्टपैलू-मार्को यानसेन, रविंद्र जड़ेजा, एडेन मार्करम
- फलंदाज- सूर्य कुमार यादव,ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर,रीजा हेंड्रिक्स
- गोलंदाज-तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी, रवि बिश्नोई
दक्षिण अफ्रिकेची खेळपट्टी तशी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे एखादा गोलंदाज चालला की वरचं सर्वच गणित फिस्कटून जाईल. भारतीय फलंदाजांचा विदेशी धरतीवर जम बसला की नाही हे पहिल्या सामन्यानंतरच दिसून येील. त्यामुळे आता कोणता खेळाडू वरचढ ठरतो आणि कोण पॉइंट्सचं गणित सोडवतं हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.