हिंदू धर्मावर गाढ श्रद्धा, धोतर घालून मंदिरात पोहोचला हा खेळाडू
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका दक्षिण आफ्रिकन खेळाडूनंही देवीच्या मंदिराला भेट दिली.
नवी दिल्ली : देशभरात नवरात्रोत्सव (Navaratri) उत्साहात साजरा केला जातोय. यानिमित्त नऊ दिवस उत्साहाचं वातावरण असणार आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल. तर भाविक आनंदानं गरबा खेळतील. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका दक्षिण आफ्रिकननंही (IND vs AUS) मंदिराला भेट दिली. आम्ही बोलत आहोत स्टार ऑलराऊंडर केशव महाराज (keshav maharaj) याच्याबद्दल. केशवच्या मनात हिंदू देवी-देवतांवर नेहमीच विशेष श्रद्धा होती. त्यानं ते दाखवून दिलं.
धोतर घालून मंदिरात
भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील सदस्य केशवनं तिरुवनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात प्रार्थना केली. या खास क्षणाचा फोटोही त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
पारंपरिक पद्धतीनं धोतर घालून पूजा करताना केशव महाराजांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये त्याने सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत जय माता दी असे लिहिले आहे.
डर्बन येथे जन्मलेले केशव महाराज हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारा केशव महाराजांचे पूर्वज एकेकाळी भारतात राहत होते.
केशवच्या कुटुंबात चार सदस्य आहेत. त्याचे आई-वडील आणि एक बहीण आहे. हीचे लग्न श्रीलंकेतील एका व्यक्तीशी झाले आहे. केशव महाराज याचे वडील आत्मानंद हे देखील क्रिकेटपटू होते. ते दक्षिण आफ्रिकेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले होते.
आत्मानंद यांना कधीच कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. आजोबाही क्रिकेटपटू होते. केशव महाराज हे हनुमानजींचे परम भक्त आहेत. दक्षिण आफ्रिकेत राहूनही प्रथा पाळल्या जातात. भारतीय सण साजरे करतात.
पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिला सामना 28 ऑक्टोबरला तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर होणार आहे. मॅचच्या एक दिवस आधी नेटमध्ये जाण्यापूर्वी मेन इन ब्लूजला सोमवारी एक दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.
विमानतळावरून रोहित शर्माची टीम स्टेडियमवर पोहोचताच चाहत्यांची गर्दी झाली होती. T20 विश्वचषक संघातून वगळल्यानंतर अनेकांनी स्थानिक हिरो असलेल्या संजू सॅमसनचे नाव घेतले.