इंग्लंड श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका, पण वर्ल्ड टेस्ट फायनलचं स्वप्न राहणार अधुरं, का ते जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीतील महत्त्वाची मालिका इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. ही मालिकेमुळे गुणतालिकेवर काही अंशी फरक पडेल. पण टॉप दोनमध्ये येण्याचं इंग्लंडचं गणित सुटणं मात्र कठीण आहे. कसं ते समजून घेऊयात

इंग्लंड श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका, पण वर्ल्ड टेस्ट फायनलचं स्वप्न राहणार अधुरं, का ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 8:00 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु असून अंतिम फेरी जून 2025 मध्ये होणार आहे. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स मैदानात होणार आहे. पण यजमान इंग्लंडला तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता येणार नाही. सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी भारतीय संघ आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यामुळे दोन्ही संघांची विजयी टक्केवारी पाहिली तर तिथपर्यंत पोहोचणं इंग्लंडला कठीण जाईल. कारण इंग्लंडची सध्या 36.54 इतकी विजयी टक्केवारी आहे. तर टॉपला असलेल्या दोन्ही संघांची विजयी टक्केवारी 60 च्या पुढे आहे. त्यामुळे 30 टक्क्यांचं गणित सोडवणं खूपच कठीण आहे. इंग्लंड घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तान दौऱ्यावर तीन सामन्यांची कसोटी मालिका, तर न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडला आता एकूण 9 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली तरी पुढचं गणित कठीण आहे.

दुसरीकडे, श्रीलंकने संघ 8 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत इयान बेल यांच्याकडे श्रीलंकेच्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे श्रीलंकेला इंग्लंडचं बेझबॉल गणित सोडवता येईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ 50 टक्क्यासह चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेत विजय मिळवता आला तर अंतिम फेरीच्या शर्यतीत येईल. पण पराभव झाला तर श्रीलंकेचं गणित फिस्कटेल. त्यामुळे या दोन्ही संघांचं पुढचं गणित सर्वस्वी या मालिकेवर अवलंबून आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातालिकेत भारतीय संघ 68.52 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर असेल. तर न्यूझीलंड आणि श्रीलंका 50 टक्के विजयी टक्केवारीसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दक्षिण अफ्रिका संघ 38.89 विजयी टक्केवारीसह पाचव्या, पाकिस्तान 36.66 विजयी टक्केवारीसह सहाव्या आणि इंग्लंड 36.54 विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. बांग्लादेश 25 टक्के आणि वेस्ट इंडिज 18.25 टक्क्यांसह आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.