Video : तिलक वर्मा झाला सुपरमॅन, हवेत उडी घेत टिपला भन्नाट झेल, पाहा खास Video

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या.

Video : तिलक वर्मा झाला सुपरमॅन, हवेत उडी घेत टिपला भन्नाट झेल, पाहा खास Video
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 10:14 PM

मुंबई: आज आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. चेन्नईनं पहिले फलंदाजी करता खराब सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या. चेन्नईकडून धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सॅम्सने तीन, मेरेडिथ आणि कार्तिकेयने प्रत्येकी दोन गडी बाद केले. चेन्नईचे फलंदाज डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली खाते न उघडता बाद झाला. उथप्पानं 1, ऋतुराजनं 7 आणि रायुडूने 10 धावा केल्या. शिवम दुबेही 10 धावा करून बाद झाला. ड्वेन ब्राव्होने 12 धावा केल्या आणि सिमरजीत दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे मुंबई इंडियन्ससमोर चेन्नईनं 98 धावांचं लक्ष्य ठेवलंय. दरम्यान, यावेळी तिलक वर्माने घेतलेल्या झेलची प्रचंड चर्चा रंगली.

हवेत उडी घेत टिपला भन्नाट झेल, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तिलक वर्मा झाला सुपरमॅन

धोनी आणि ड्वेन ब्राव्हो या फलंदाजांची शेवटची जोडी मैदानावर होती. गोलंदाजी करण्यासाठी कुमार कार्तिकेय आला. त्याच्या स्पिन गोलंदाजीवर ब्राव्होने पाहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यामुळे हे षटक खूप धावांसाठी जाणार, असा अंदाज सीएसकेला यावेळी आला. पण दुसऱ्याच चेंडूत फुलटॉस खेळताना ब्राव्होने चेंडू मारला आणि तिलक वर्माने अगदी जवळ उभं राहून त्याचा झेल पकडला. ही झेल तिलकनं सुपरमॅन सारखी उडी मारून पकडली.

हे सुद्धा वाचा

धोनीच्या सर्वाधिक 36 धावा

चेन्नईकडून धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आजच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याची शेवटची संधी असेल. चेन्नईचे 11 सामन्यांत चार विजय मिळवून आठ गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे, मुंबईपेक्षा एक स्थान वर आहे.

धोनीचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मोईन अली झेलबाद

ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झालाय. त्यालाही आपलं खातं उघडता आलं नाही. पहिल्या षटकात फक्त पाच धावा काढता आल्या.

 मोईनची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बुमराह फॉर्ममध्ये

आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.