‘स्टुपिड..स्टुपिड..’ ऋषभ पंतने इतक्या तावातावाने कोणाला सुनावलं? व्हिडीओ होतोय व्हायरल
आयपीएल स्पर्धेत सर्वात महागडा खेळाडू म्हणून ऋषभ पंतची गणना होते. लखनौ सुपर जायंट्सने सर्वाधिक बोली लावून त्याला संघात घेतलं आणि कर्णधारपद सोपवलं. असं असताना ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत ऋषभ पंत आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनंतर ऋषभ पंत या संघाची धुरा सांभाळणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपये मोजून त्याला संघात घेतलं आहे. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. असं असातना सोशल मीडियावर ऋषभ पंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऋषभ पंतचा हा व्हिडीओ बघता बघता चर्चेचा विषय ठरला आहे. पण ऋषभ पंत या व्हिडीओच्या माध्यमातून कोणाला बोलत आहे? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. आयपीएलच्या तोंडावर हा व्हिडीओ समोर आल्याने चर्चा तर होणारच.. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ऋषभ पंत समालोचन करताना दिसत आहे. पण या व्हिडीओत तो वारंवार स्टुपिड हा शब्द वापरत आहे. ‘स्टुपिड..स्टुपिड.. स्टुपिड..’ हा शब्द वारंवार बोलण्याचा सराव करत आहे. चुकीचा उच्चार करूनही तो हा शब्द बोलत आहे. खरं तर ऋषभ पंत या माध्यमातून स्वत:लाच स्टुपिड बोलत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची नकल करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. यावेळी भारतीय संघ अडचणीत सापडला होता. या सामन्यात ऋषभ पंत एका बाजूने खिंड लढवत होता. पण एक चूक केली आणि सुनील गावस्कर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी ऋषभ पंतचा शॉट पाहून राग व्यक्त केला. ते इतके भडकले की त्यांनी रागाच्या भरात ऋषभ पंतला मूर्ख म्हंटलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. गावस्कर यांनी त्यांच्या शैलीत ‘स्टूपिड..स्टुपिड..’, असं बोललं होतं. हा व्हिडीओ ऋषभ पंतकडे पोहोचला होता. आता त्या व्हिडीओची ऋषभ पंतने नकल करण्याचा प्रयत्न केला आहे.
Rishabh Pant recreating the ‘Stupid, Stupid, Stupid!’ of Sunil Gavaskar. 🤣pic.twitter.com/JhrK34luWh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2025
ऋषभ पंतच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. पण या पर्वात ऋषभ पंतच्या खांद्यावर खूपच मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा चुका करून चालणार नाही, असं तो या माध्यमातून दाखवत असावा. दरम्यान, कसोटीत ऋषभ पंतला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. पण टी20 आणि वनडेत त्याला संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे आता ऋषभ पंतला सिद्ध करण्याची एकमेव संधी चालून आली आहे. जर आयपीएलमध्ये कामगिरी उंचावता आली नाही तर संघातून बाहेरचा रस्ता मिळू शकतो.