मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास लखनौ सुपर जायंट्स हा संघा दुसऱ्या स्थानावर आहे. लखनौनं एकूण 10 सामने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आतापर्यंत खेळले आहे. त्यापैकी त्यांना 7 सामन्यात जिंकता आलंय. तर 3 सामन्यात मात्र अपयशाचा सामना करावा लागलाय. लखनौ संघाचा नेट रेट 0.397 आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौला 14 पॉईंट्स मिळाले आहेत. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या सीजनमध्ये एकूम 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना 4 सामनेच फक्त जिंकता आले आहे. तर उर्वरीत 6 सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय. कोलकाता संघाचा नेट रेट हा 0.060 इतका आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता संघाला 8 गुण मिळाले आहेत. लखनौ विरुद्ध कोलकाता सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असेसिएशन स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार असून सात वाजता टॉस होईल.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 7 मे (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असेसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.