IPL Media Rights Auction : आज 50 हजार कोटींपेक्षा जास्त बोली लागणार? प्रसारण हक्क्यांच्या बोलीत चढाओढ
आज दुसऱ्या दिवशी 50 हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीची बोली लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय.
नवी दिल्ली : आयपीएलच्या (IPL) 2023 ते 2027 या पाच वर्षांसाठी प्रसारण हक्कांची बोली (Media Rights Auction) रविवारी सुरू झाली. ही बोली रविवारी 43 हजार 500 कोटींवर गेली आहे. त्यामध्ये आज आणखी वाढ होऊ शकते. यात सर्वात जास्त बोली कुणी लावली आहे. याचा खुलासा होऊ शकलेला नाही. त्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी 50 हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीची बोली लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय. यात पहिल्याच दिवशी प्रत्येक सामन्यासाठी 104 ते 105 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. जर या बोलीनं 50 हजारांचा कोटींचा आकडा पार केला. तर कोणत्याही खेळातील स्पर्धेच्या प्रसारण हक्कांसाठी (Media Rights) लावण्यात आलेला सर्वात मोठा आकडा असेल.
या चार कंपन्या आघाडीवर
- ग्रुप ए आणि बी यामध्ये अजूनही बोली वाढत आहे
- यामध्ये आकडा 50 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे
- ग्रुप सी आणि ग्रुप डी यामध्ये देखील जास्त रकमेचा अंदाज लावला जाऊ शकतो
- ए आणि बी या पॅकेजसाठी जर 45 हजार कोटींवर बोली थांबली तर हा 55 हजार कोटींचा होईल
टक्कर कोणत्या कंपन्यांमध्ये
- लिलावाच्या पाहिल्या दिवशी व्हायकॉम 18, स्टार आणि सोनी यांच्यात टक्कर दिसून आली
- पहिल्या दिवशी प्रती सामना 54 कोटी रुपयांपर्यंत बोली गेली
- तर डिजिटल अधिकारांसाठी 50 कोटींची बोली लावण्यात आली
- बाजी कोण मारणार याची घोषणा 13 जूनला होणार
- सध्या एक सामन्यासाठी किमान 104 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे
- एका सामन्याच्या हिशेबाने आयपीएल ही दुसरी सर्वात मोठी लीग ठरेल
- अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगाल सर्वाधिक बोली मिळाली आहे.
- एका सामन्यासाठी 132 कोटी मिळाले आहेत.
बीसीसीआयला फायदाच फायदा
- 410 सामने 5 वर्षात होऊ शकतात
- 16 हजार कोटींची बोली यापूर्वी लावली आहे
- 2008 मध्ये पहिल्यांदाच आयपीएलच्या प्रसारण हक्कतून बीसीसीआयला 8200 कोटी मिळाले होते
- तेव्हा ही दहा वर्षांसाठी बोली होती
- 2017 ते 2022 या कालावधीसाठी 16347 कोटी रुपये मिळाले होते.
- आता गेल्या वेळेपेक्षा ही बोली जवळपास तिप्पट होऊ शकते.
मेगाची किंमत 43 हजार कोटींच्या पुढे
आयपीएल मीडिया राईटचा लिलाव जोरात सुरू आहे. आतापर्यंत मेगाची किंमत 43 हजार कोटींच्या पुढे गेली असून ती 50 हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ही आधीच्या मीडिया राईटच्या लिलावाच्या तिप्पट आहे. विशेष म्हणजे केवळ दोन पॅकेजसाठी 43 हजार कोटी रुपयांची बोली लागली आहे. यामध्ये टीव्ही अधिकार आणि डिजिटल अधिकार समाविष्ट आहेत, संपूर्ण मीडिया अधिकारांची रक्कम खूप जास्त असू शकते.
यावेळचा दर काय आहे?
अलिकडच्या काळात बरेच बदल झाले असून डिजिटलवर अधिक भर दिला जात आहे. यामुळेच आयपीएल 2023 ते आयपीएल 2027 पर्यंत मीडिया अधिकार चार पॅकेजमध्ये विभागले गेले आहेत.