INDvsAUS | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, नक्की काय काय झालं?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसातील घडामोडी जाणून घेऊयात.

INDvsAUS | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, नक्की काय काय झालं?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 7:34 PM

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. या दुसऱ्या दिवसातही टीम इंडियाचा बोलबाला राहिला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या एका युवा गोलंदाजानेही टीम इंडियाला नाचवलं. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दुसऱ्या दिवशी सामन्यादरम्यान नक्की काय काय झालं, हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात

टीम इंडियाने पहिल्या दिवशी 77 धावांवर केएल राहुल याच्या रुपात एकमेव विकेट गमावली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात 77 बाद 1 विकेट या धावसंख्येपासून केली. तेव्हा आर अश्विन आणि कॅप्टन रोहित शर्मा मैदानात होते. अश्विन मैदानात सेट झाला होता. पण अश्विन आऊट झाला.

अश्विननंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे तिघे ही आऊट झाले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टोड मर्फी याने केएल राहुलला आऊट करत ऑस्ट्रेलिया आणि स्वत:च्या खात्यात 1 विकेट जोडली. त्यानंतर या तिघांचा काटा काढत एकूण 4 विकेट मर्फीने घेतल्या.

हे सुद्धा वाचा

तर दुसऱ्या बाजूला 4 महत्वाचे विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली होती. पण नागपूरचा वाघ रोहित एक बाजू लावून होता. रोहितने या दरम्यान झुंजार शतक ठोकलं.

रोहितसाठी कर्णधार म्हणून हे शतक फार विशेष ठरलं. रोहित टीम इंडियाचा कर्णधार म्हणून टी 20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला.

रोहित शतकानंतर झोकात खेळेत होता. मात्र मर्फीनेच रोहितचा काटा काढला. मर्फीने रोहितला 120 धावांवर क्लीन बोल्ड केलं. अशाप्रकारे मर्फीने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखीही संपवली. तसेच पदार्पणातच 5 विकेट्स घेतल्या.

रोहित आऊट झाल्याने टीम इंडिया डाव गडबडला. रोहित पाठोपाठ केएस भरतही माघारी परतला. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने कांगारुंना बॉलिंगनंतर बॅटिंगने नाचवलं. या जोडीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 81 धावांची नाबाद भागीदारी केली. तसेच दोघांनी वैयक्तिक अर्धशतकही ठोकली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 114 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 321 धावा केल्या. जडेजा 66 तर अक्षर 52 धावांवर नाबाद आहेत. टीम इंडिया 144 धावांनी आघाडीवर आहे. त्यामुळे आता ही जोडी तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला आणखी किती धावांची आघाडी मिळवून देते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाची आकडेवारी थोडक्यात

टीम इंडिया : 7 बाद 321 धावा, 114 ओव्हर, 144 धावांची आघाडी. रवींद्र जडेजा – 66* अक्षर पटेल – 52*

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.