Cricket : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, भारताच्या या मॅचविनर स्टार खेळाडूवर लावला बॅन

Team India : आशिया कपवर नाव कोरल्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपसाठी सज्ज झालाय. त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Cricket : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, भारताच्या या मॅचविनर स्टार खेळाडूवर लावला बॅन
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 10:02 AM

मुंबई : आशिया कपनंतर आता आगामी वर्ल्ड कपचे वारे वाहताना दिसत आहे. वर्ल्ड कपचा थरार सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. आशिया कपवर नाव कोरल्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपसाठी सज्ज झालाय. त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची वन डे मालिका होणार असून संघही जाहीर करण्यात आला आहे. अशातच भारतीय कसोटी संघाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराबाबत वाईट समोर आली आहे. चेतेश्वर पुजारावर बंदी घातली गेलीये.

नेमकं काय आहे प्रकरण?

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये चेतेश्वर पुजारा हा ससेक्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत होते. पुजाराच्या संघाला एकाच सीझनमध्ये 4 पेनल्टी मिळाल्या. त्यामध्ये जॅक कार्सन, टॉम हेन्स आणि एरी कार्वेला यांना गैरवर्तन केल्या प्रकरणी तीन सामन्यांमध्ये संघात येणार नाही. यामुळे ससेक्स संघाचे 12 गुण कमी झाले. इतकंच नाहीतर कर्णधार असलेल्या चेतेश्वर पुजारा याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आलीये.

जॅक आणि टॉम यांच्यावर पंच आणि रेफ्रींनी दोन्ही खेळाडूंवर मैदानावरील लेव्हल वन आणि लेव्हल टू गुन्ह्यांचा आरोप लावला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन अशा वागणुकीला माफ करता येणार नाही, असं प्रशिक्षक पॉल फारब्रेक म्हणाले. ईसीबीने चेतेश्वर पुजारा यांच्यावर लावण्यात आलेल्या बॅनबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. नियमानुसार 4.30 नुसार संघामधील सहकारी खेळाडूंनी काही गुन्हा केला असेल आणि या सामन्यांनध्ये एकच कर्णधार असतो त्याचं एका सामन्यात निलंबन केलं जातं.

दरम्यान, 35 वर्षीय चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत 103 कसोटींमध्ये 19 शतके आणि 35 अर्धशतके करत 7195 धावा केल्या आहेत. तर पुजाराच्या नावावर वन डे सामन्यांनमध्य 19,533 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक त्रिशतकही केलं असून 60 शतके आणि 77 अर्धशतकांचा समावेश आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....