Video : फिल्डिंग करताना पाठीमागून चाहत्यांनी घेतली मजा, एकट्या पठ्ठ्याने सगळ्यांना गंडवलं, व्हिडीओ तुफान व्हायरल
Travia Head Viral Video : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. यामधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळाला आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. MCG येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर कांगारूंनी पकड मिळवली असून पाकिस्तान संघ बॅकफूटला ढकलला गेला आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रिलियाचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याने स्टेडियममध्ये प्रेक्षकांसोबत मस्ती करत त्यांना चांगलंच घनचक्कर केलं.
नेमकं काय केलं?
ट्रॅव्हिस हेड बाऊन्ड्री लाईनवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी मागे बसलेल्या चाहत्यांन अनेकवेळा तो जसं करेल तसं अनुकरण केलं. हेडने ज्या प्रकारे हावभाव करत होता तशाचा प्रकारे मागे बसलेले चाहतेही करत होते. हेडच्या लक्षात आसं की प्रेक्षक तो जसं करेल तशाच प्रकारचे हावभाव करत आहे. मग पठ्ठ्यानेही त्यांची मजा घ्यायचं ठरवलं.
हेडने व्यायामाचा एक प्रकारच करू लागला, डोके हात आणि पाय हलवू लागला. त्यानंतर मागे बसलेल प्रेक्षकही त्याची नक्कल करू लागले. हेडने वेग पकडला आणि जोरात हात पाय हलवू लागला, मागे प्रेक्षकांनीही वेग पकडला. पण तितक्यात तो थांबला आणि प्रेक्षक गडबडले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ-
Travis Head getting the crowd roaring! #AUSvPAK pic.twitter.com/ISL3D7UG2a
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2023
दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 318 धावांवर आटोपला, पाकिस्तान संघाची बिकट अवस्था झाली आहे. 194 धावांवर 6 विकेट गेल्या असून पाकिस्तान संघ अजून चांगलाच पिछाडीवर आहे. मोहम्मद रिझवान नाबाद 29 धाला आणि आमेर जमाल नाबाद 2 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 तर नाथन लियॉन याने 2 विकेट घेतल्या आहेत.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड