आज 22 जुलै. न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा वाढदिवस. ट्रेंट बोल्ट आज 35 वर्षांचा झाला. आज वाढदिवशी ट्रेंट बोल्टच्या क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त प्रदर्शन केलं. एका खेळाडूसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते?. ट्रेंट बोल्टने त्याच्या 35 व्या वाढदिवशी अमेरिकेत आग ओकणारी गोलंदाजी केली. तिथे तो T20 चे सामने खेळतोय. त्याने 4 ओव्हर्सचा एक घातक स्पेल टाकला. त्यामध्ये IPL मधून 107 कोटी कमावणारा खेळाडू सुद्धा हतबल झाला.
मेजर लीग क्रिकेट म्हणजे MLC 2024 मध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क विरुद्ध लॉस एंजिलिस नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी केली. सुनील नरेन आणि जेसन रॉय फलंदाजीसाठी उतरले होते. ही जोडी धोकादायक ठरण्याआधीच बर्थ डे बॉय ट्रेंट बोल्टने आपलं काम करुन टाकलं. त्याने नव्या चेंडूने पहिल्याच ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर सुनील नरेनची विकेट काढली. नरेनने आयपीएलमधून 107 कोटींची कमाई केली आहे. MLC 2024 च्या पीचवर बोल्टची ही 8 वी शिकार आहे.
6 इनिंग नंतर 30 धावाही करु शकलेला नाही
सुनील नरेनने IPL मधुन 107 कोटीपेक्षा अधिक कमाई फक्त एक फ्रेंचायजी कोलकाता नाइट रायडर्सकडून कमावले आहेत. KKR साठी सुनील नरेन दहा वर्षापेक्षा पण अधिक काळासाठी खेळतोय. MLC 2024 मध्ये सुद्धा तो शाहरुख खानची टीम लॉस एंजिलिस नाइट रायडर्सचा भाग आहे. सुनील नरेन इथे सलग 5 सामन्यात अपयशी ठरला. त्यानंतर 6 व्या इनिंगमध्ये तो स्फोटक फलंदाजी करेल, अशी अपेक्षा होती. पण बर्थडे बॉय ट्रेंट बोल्ट समोर नरेनच काही चाललं नाही. MLC 2024 मध्ये 6 इनिंग नंतरही सुनील नरेन 30 धावाही करु शकलेला नाही.
स्वत:च्या नावावर 9 वा विकेट
ट्रेंट बोल्टच सुनील नरेनची विकेट काढून समाधान झालं नाही. त्याने उर्वरित 2 ओव्हरमध्ये कॉर्ने ड्राईचा विकेट काढला. त्याच बरोबर MLC 2024 मध्ये स्वत:च्या नावावर 9 वा विकेट केला. MLC 2024 मध्ये आतापर्यंत 6 सामन्यात 9 विकेट घेऊन ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचा यशस्वी गोलंदाज ठरलाय.