Cricket: टीमला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे ‘क्लिन बोल्ड’, या स्पर्धेतून बाहेर
Cricket Injury: सप्टेंबर महिन्यात ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड येथे न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानचा राशिद खान याला द हन्ड्रेड स्पर्धेत दुखापत झाली आहे.

इंग्लंडमध्ये सध्या द हन्ड्रेड स्पर्धेचा थरार सुरु आहे.या स्पर्धेदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत अनेक देशातील खेळाडू सहभागी झाले आहेत. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याला या स्पर्धेत दुखापत झाली आहे. राशिद खान या स्पर्धेत ट्रेन्ट रॉकेट्स टीमचं प्रतिनिधित्व करतोय. मात्र आता राशिदला दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला मुकावं लागणार आहे. ट्रेन्ट रॉकेट्स टीमने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मात्र राशिदला नक्की काय झालंय? याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. राशिदने आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगने टीमसाठी निर्णायक भूमिका बजावली.
राशिद खान याची कामगिरी
राशिदने द हंड्रेड स्पर्धेतील या हंगामातील 5 डावांमध्ये 44 धावा केल्या. तसेच 9 विकेट्स घेतल्या. राशिदने ऑलराउंडर या भूमिकेला न्याय दिला. आता राशिदच्या जागी संघात क्रिस ग्रीन याचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा ऐन रंगात असताना राशिद दुखापतीचा शिकार झाल्याने टीमला तगडा झटका बसला आहे. तसेच अफगाणिस्तान सप्टेंबर महिन्यात नोएडात न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे राशिद दुखापत लवकर सावरला नाही, तर त्याला भारतातही येता येणार नाही. त्यामुळे हा अफगाणिस्तानसाठीही मोठा धोका ठरु शकतो.
कोण आहे क्रिस ग्रीन?
राशिदच्या जागी संघात संधी मिळालेला क्रिस ग्रीन हा ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर आहे. ग्रीन आपल्या फिरकी बॉलिंगसाठी ओळखला जातो. तसेच तो बॅटिंगही करतो. आता राशिदच्या जागी संधी मिळाल्याने क्रिसकडून चांगल्या आणि भरीव कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
राशिद खान स्पर्धेतून बाहेर
Rashid Khan ruled out of The Hundred.
– Chris Green has replaced him in the team. pic.twitter.com/9PJQlMzbcK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 12, 2024
द हंड्रेड स्पर्धेसाठी ट्रेन्ट रॉकेट्स टीम: जो रूट, रिले मेरेडिथ, रोवमॅन पॉवेल, राशिद खान, इमाद वसीम , एलेक्स हेल्स, लुईस ग्रेगरी, ल्यूक वुड, टॉम बँटन, जॉन टर्नर, सॅम हॅन, सॅम कुक, केल्विन हॅरिसन, जॉर्डन थॉम्पसन, एडम लिथ, ओली रॉबिन्सन आणि टॉम अलसोप.