आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायरन पोलार्डची जादू आता ओसरली आहे. पण स्थानिक T20 क्रिकेटमध्ये अजूनही पोलार्डची दहशत कायम आहे. CPL 2024 मध्ये मंगळवारी झालेल्या सेंट लुसिया किंग्स विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने आपला जलवा दाखवला. त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या पोलार्डने फक्त 19 चेंडूत धडाकेबाज खेळ दाखवला. त्याच्या इनिंगमध्ये चौकार नव्हतेच फक्त षटकारांचा पाऊस पडला. पोलार्डच्या या तडाख्यामुळे त्रिनबागो नाइट रायडर्सने फाफ डु प्लेसीच्या सेंट लुसिया किंग्सला सहज धूळ चारली.
कायरन पोलार्ड फक्त एक खेळाडू नाहीय, त्रिनबागो नाइट रायडर्सचा कॅप्टन सुद्धा आहे. पोलार्ड टीमसाठी कॅप्टन इनिंग खेळला. पोलार्डच्या तडाखेबंद खेळीच सेंट लुसिया किंग्सकडे कुठलही उत्तर नव्हतं. त्रिनबागो नाइट रायडर्स विजयी होईपर्यंत पोलार्डची ही तडाखेबंद बॅटिंग सुरुच होती. पोलार्ड 19 चेंडू खेळला. त्याच्या फलंदाजीने सर्वच थक्क झाले. 273.68 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 52 धावा केल्या. यात 7 सिक्स आहेत.
फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजीतूनही पोलार्डच योगदान
सेंट लुसिया किंग्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 187 धावा केल्या. विजयासाठी 188 धावांचा सामना करणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्सने 5 चेंडू राखून विजय मिळवला. त्रिनबागो नाइट रायडर्सने 4 विकेटने हा सामना जिंकला. कायरन पोलार्ड या विजयाचा हिरो ठरला. फक्त फलंदाजीनेच नव्हे, तर गोलंदाजीतूनही पोलार्डने योगदान दिलं. त्याने 22 धावा देऊन 1 विकेट काढला.
Kieron Pollard is awarded @Dream11 MVP! Well done Polly 🙌🏾 #CPL24 #SLKvTKR #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport #Dream11 pic.twitter.com/AASf9KO7mC
— CPL T20 (@CPL) September 11, 2024
संपूर्ण सामन्यात 30 सिक्स
त्रिनबागो नाइट रायडर्स आणि सेंट लुसिया किंग्सच्या या सामन्यात एकूण 30 षटकार मारण्यात आले. यात सर्वाधिक 7 सिक्स पोलार्डने मारले. त्याच्याशिवाय युवा टीम मेट 21 वर्षाच्या पॅरिसने 6 सिक्स मारले. त्याने 33 चेंडूत 57 धावा केल्या.. त्रिनबागो नाइट रायडर्सने एकूण 17 सिक्स मारले. सेंट लुसिया किंग्सने 13 षटकार मारले.