मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रेक्षक दर आठवड्याला येणाऱ्या TRP रिपोर्टची आतुरतेने वाट पाहतात. टीआरपी लिस्टमध्ये फॅन्स आपल्या आवडत्या सीरियलचा शोध घेतात. BARC ने या आठवड्यात 19 वी TRP लिस्ट जारी केली आहे. या लिस्टवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, IPL समोर ‘अनुपमा’ सोडून बाकी सीरियल्सच्या TRP रेटिंगची नौका बुडाली आहे. मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही स्टार प्लस वाहिनीवरील फेमस शो ‘अनुपमा’ BARC च्या टीआरपी लिस्टमध्ये टॉपवर आहे.
या शो ची रेटिंग 2.8 आहे. आयपीएल नंतर अनुपमाच्या टीआरपी रेटिंगमध्ये फक्त 0.2 ते 0.3 इतकाच बदल झालाय. अन्य सीरियल्सची मात्र खूप वाईट अवस्था आहे.
दुसऱ्या नंबरवर कोण ?
अनुपमाशिवाय आयशा सिंह आणि नील भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुम हैं किसी के प्यार में’ आणि प्रणाली राठोड-हर्षद चोपड़ा यांचा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे शो टीआरपी रेटिंगमध्ये दुसऱ्या नंबरवर आहेत. या दोन्ही शो च रेटिंग 2.2 आहे. क्रिकेटमुळे टीव्ही मालिकांच्या टीआरपीमध्ये 0.7 ते 0.8 पर्यंत घसरण झालीय.
टॉप 10 मध्ये ‘या’ दहा मालिका
BARC च्या टीआरपी रिपोर्टमध्ये छोट्या पडद्यावरील टॉप 10 शो मध्ये इमली, पंड्या स्टोर, ये हैं चाहतें, फालतू, तारक मेहता का उलटा चश्मा, भाग्यलक्ष्मी आणि तेरी मेरी दूरियां हे शो ज आहेत.
ट्रोलिंग होऊनही ‘अनुपमा’ हिट
BARC ने जारी केलेल्या टीआरपी लिस्टमध्ये स्टार प्लस वाहिनीचे अनेक कार्यक्रम टॉप 10 मध्ये आहेत. रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘अनुपमा’ मालिकेला करंट ट्रॅकमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ट्रोलिंग होऊनही शो च्या टीआरपी रेटिंगवर फार परिणाम झाला नाही. त्यामुळे 19 व्या आठवड्यातही ‘अनुपमा’ पहिल्या स्थानावर कायम आहे.
कपिल शर्माच्या शो च काय?
कपिल शर्माचा शो सुद्धा या आठवड्यात विशेष कमाल दाखवू शकला नाही. द कपिल शर्मा शो आणि इंडियाज बेस्ट डान्स सीजन 3 या दोन्ही कार्यक्रमांची टीआरपी या आठवड्यात 1.1 आहे.