Tushar Deshpande ने हैदराबादचा माज उतरवला, पावर प्लेमध्ये हेडसह तिघांना दाखवला बाहरेचा रस्ता दाखवला
Tushar Deshpande 3 wickets In Power Play : तुषार देशपांडे याने सनरायजर्स हैदराबादला पावर प्लेमध्ये 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं. तुषारने हेड, अनमोलप्रीत आणि अभिषेक या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या तुषार देशपांडे याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 46 व्या सामन्यात धमाका केलाय. तुषारने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सला शानदार सुरुवात मिळवून दिली. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. तुषार देशपांडेने सनरायजर्स हैदराबादला रडकुंडीला आणलं. तुषारने हैदराबादच्या डावातील दुसरी आणि आपल्या कोट्यातील पहिल्या ओव्हरमधील शेवटच्या 2 बॉलमध्ये सलग 2 झटके दिले. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्येही तुषारने आणखी एक झटका दिला.
पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये जोरदार बॅटिंग करुन धावा करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघांचा असतो. हैदराबादने या हंगामात पहिल्या डावात विस्फोटक बॅटिंग करत अनेक रेकॉर्ड्स केले. मात्र चेसिंग करताना हैदराबाद उघडी पडली. तुषारने हैदराबादच्या टॉप ऑर्डरचा बाजार उठवला. तुषारने दिलेल्या 3 झटक्यांमुळे हैदराबाद पूर्णपणे बॅकफुटवर ढकलली गेली.
तुषारने दुसऱ्या ओव्हरमधील पाचव्या आणि सहाव्या बॉलवर ट्रेव्हिस हेड आणि अनमोलप्रीत सिंह या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तुषारने हेडला डॅरेल मिचेलच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 13 धावा केल्या. तर त्यानंतर पुढील बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात अनमोलप्रित सिंह कॅच आऊट झाला. अनमोलला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर तुषार देशपांडे चौथी आणि आपल्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकायला आला. तुषारने सलग 2 विकेट्स घेतल्याने त्याला हॅटट्रिक घेण्याची संधी होती. तुषारला हॅटट्रिक घेता आली नाही. मात्र त्याने या ओव्हरमध्ये विकेट घेतली.
तुषारचा हैदराबादला दणका
Tushar Deshpande show at Chepauk. ⭐pic.twitter.com/aeRsPVqVf4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2024
तुषारने हैदराबादच्या चौथ्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर अभिषेक शर्मा याला डॅरेल मिचेल याच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकने 9 बॉलमध्ये 15 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादची 3 बाद 40 अशी स्थिती झाली. तुषारने अशाप्रकारे 2 ओव्हरमध्ये 11.50 च्या इकॉनॉमी रेटने 23 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान आणि मथीशा पथीराना
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.