ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात फक्त दोन बदल! कर्णधार रोहित शर्माने दिली अशी हिंट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. तर कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत हिंट दिली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानात आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पिंक बॉल टेस्ट असल्याने भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. कारण याच मैदानावर भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे पिंक बॉल कसोटीचा वचपा काढण्याची संधी रोहित सेनेकडे आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा दावा पक्का करायचा आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने नेतृत्व केलं होतं. मात्र आता रोहित परतल्याने संघात उलथापालथ होणार हे निश्चित आहे. विजयी संघातून कोणाला डावलणार आणि कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत प्लेइंग इलेव्हनबाबत हिंट दिली आहे.
‘केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील भागीदारीने कसोटी सामना जिंकला. मला वाटत नाही की यात काही बदल केला पाहीजे. माझ्यासाठी हे सोपं राहील आणि टीमच्या फायद्याचं राहील.’, कर्णधार रोहित शर्माने असं सांगत ओपनिंगला केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल येईल यावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर गोलंदाजीतही फारसा बदल होणार हे त्याच्या एका वाक्यातून स्पष्ट झालं आहे. ‘हर्षित आणि नितीशचा पहिलाच कसोटी सामना होता असं अजिबात वाटलं नाही. त्यांची बॉडी लँग्वेज एकदम जबरदस्त होतील. असे खेळाडू जेव्हा तुम्हाला मोठी मालिका जिंकायची असते तेव्हा तुम्हाला असे खेळाडूंची गरज असते.’, असं सांगत रोहितने हर्षित आणि नितीशची प्लेइंग इलेव्हनमधील जागा जवळपास पक्की असल्याचं सांगितलं आहे.
त्यामुळे दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला आराम मिळेल असंच दिसत आहे. कारण पिंक बॉलवर वेगवान गोलंदाजांचा प्रभाव जास्त असतो. त्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असतील. तसेच फिरकीसाठी वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळेल. त्यामुळे देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच रोहित शर्मा आणि शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड