नवी दिल्ली : वेस्ट इंडिजची टीम सध्या झिम्बाब्वेमध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 क्वालिफायरचे सामने खेळत आहे. क्वालिफायर राऊंड खेळण्यासाठी टीम झिम्बाब्वेमध्ये दाखल झाली, त्यावेळी टीमचे कोच कार्ल हुपर यांनी यापेक्षा अजून वाईट काय होऊ शकतं? असं म्हटलं होतं. हुपर जे बोलले, त्याचे परिणाम आता 10 दिवसात दिसत आहेत. दोनवेळची वर्ल्ड कप विजेती टीम वेस्ट इंडिज, 2023 वर्ल्ड कप शर्यतीतून बाहेर होताना दिसतेय. म्हणजे कोचच्या मनात टीमच्या प्रदर्शनाबद्दल जी भिती होती. ते वास्तवात घडताना दिसतय.
वेस्ट इंडिजच्या टीमचा झिम्बाब्वेकडून पराभव झाला, तरी सुद्धा अपेक्षा होती. आता नेदरलँड्सकडून झालेल्या पराभवाने उरल्या-सुरल्या अपेक्षा धुळीस मिळवल्यात. नेदरलँड्सकडून हरल्यानंतरही वेस्ट इंडिजची टीम सुपर सिक्समध्ये पोहोचली आहे. पण त्यांच्या खात्यात 0 पॉइंट्स आहेत. असं यासाठी कारण त्यांना झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
वर्ल्ड कपच्या बाहेर जाणं निश्चित
श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान या टीम सुद्धा दुसऱ्या ग्रुपमधून सुपर सिक्समध्ये दाखल झाल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या टीमने सुपर सिक्समध्ये या तीन टीम्सना हरवलं, तरी त्यांचे 6 पॉइंट्स होतील. 4 पॉइंट्ससवर असणाऱ्या झिम्बाब्वेच्या टीमने तीन पैकी दोन सामने जिंकले, तरी ते वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनलमध्ये पोहोचतील. म्हणजे वेस्ट इंडिजच बाहेर होण निश्चित आहे. सुपर सिक्स गटातून टॉप 2 टीम्स फायनलमध्ये पोहोचतील. त्यांना भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच तिकीट मिळेल.
#CWC23Qualifiers #WorldCup2023
LOGAN VAN BEEK…. YOU CHAMPION!4,6,4,6,6,4 in the Super Over against Jason Holder to take the Netherlands to 30. One of the craziest striking in the Super Overs.
No one will scroll down without liking ❤️ this videopic.twitter.com/Au25XFrfj2— ??? (@superking1816) June 26, 2023
सलग दुसऱ्यावर्षी वेस्ट इंडिजला झटका
1975 आणि 1979 असा दोनवेळा वेस्ट इंडिजच्या टीमने वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कपमध्येही वेस्ट इंडिजची टीम नव्हती. ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करता आलं नव्हतं. स्कॉटलंड आणि आयर्लंडने ग्रुप स्टेजमध्ये खेळ बिघडवला होता. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या दोन टीम्सनी वेस्ट इंडिजला झटका दिलाय.