IND vs PAK Toss : पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडियाविरुद्ध बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
India vs Pakistan Women U 19 Asia Cup 2024 Toss : महामुकाबल्यात पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पाहा प्लेइंग ईलेव्हन.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात येत आहे. तर इथे क्वालांपूर येथे अंडर 19 वूमन्स आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी काही मिनिटांपूर्वी टॉस झाला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
सामना कुठे पाहता येणार?
निकी प्रसाद हीच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. झूफीशान अय्याझ ही पाकिस्तानची कर्णधार आहे. उभयसंघातील या टी 20i सामन्याचं आयोजन हे बयूमास क्रिकेट ओवल, क्वालालांपूर येथे करण्यात आलं आहे. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.
6 संघ आणि 2 गट
दरम्यान वूमन्स अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत एकूण 6 सहभागी संघांना 3-3 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये यजमान मलेशिया, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहेत. त्यानंतर बाद फेरीतील सामने होतील.
पाकिस्तान टॉसचा बॉस
🏏 ACC Women’s U19 T20 Asia Cup 2024 🏏
Pakistan win the toss and elect to bat first against India 🪙#ACCWomensU19AsiaCup | #PAKWvINDW | #BackOurGirls pic.twitter.com/WdCF2vWNmD
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 15, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : निकी प्रसाद (कॅप्टन), सानिका चाळके, जी त्रिशा, जी कामिलिनी (विकेटकीपर), भाविका अहिरे, मिथीला व्ही, जोशिथा व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदीया, आयुषी शुक्ला आणि शबनम एमडी शकील.
वूमन्स पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : झूफीशान अय्याझ (कॅप्टन), कोमल खान (विकेटकीपर), फिझा फैझ, क़ुर्रतुलैन, महम अनीस, फातीमा खान, रोझीना अक्रम, रावली फरहान, माहेनूर झेब, आरीशा अन्सारी आणि आलिसा मुखतीयार,