IND vs PAK Toss : पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडियाकडून वसईच्या आयुष म्हात्रेला संधी
U 19 Asia Cup 2024 India vs Pakistan Toss : टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे.
अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघ या सामन्याने आशिया कप मोहिमेची सुरुवात करत आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडयिममध्ये करण्यात आलं आहे. साद बैग याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर मोहम्मद अमान टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. पाकिस्तानने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
आयुष आणि वैभवला संधी
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये वसईच्या आयुष म्हात्रे याचा समावेश करण्यात आला आहे. आयुषने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईसाठी उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्याच जोरावर आयुषला भारतीय संघात संधी मिळाली आणि आता त्याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयुषच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आयपीएल इतिहासातील सर्वात युवा कोट्यधीश वैभव सूर्यवंशी हा देखील प्लेइंग ईलेव्हनमध्ये आहे. वैभव सूर्यवंशी याला नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपये मोजूनमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं होतं.
पाकिस्तान टीम इंडियावर वरचढ
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा पाकिस्तानवर वर्चस्व केलं आहे. टीम इंडिया कायमच पाकिस्तानवर वरचढ ठरत आलीय. मात्र अंडर 19 आशिया कप स्पर्धेत चित्र जरा वेगळं आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये 6 सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानने या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये टीम इंडियावर मात केली आहे. तर टीम इंडियाला फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाच्या तिसऱ्या विजयाची प्रतिक्षा सर्वांनाच असणार आहे.
पाकिस्तान टॉसचा बॉस
🏏 ACC Men’s U19 Asia Cup 2024 🏏
Pakistan U19 win the toss and elect to bat first against India U19 🪙#PAKvIND | #PakistanFutureStars | #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/Jj0Bwwd1RL
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 30, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, हरवंश सिंग (विकेटकीपर), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज आणि युधाजित गुहा.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साद बेग (कर्णधार आणि विकेटकीपर), शाहजेब खान, उस्मान खान, फरहान युसफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाजुल्ला, हारून अर्शद, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब आणि नावेद अहमद खान.