IND vs BAN : टीम इंडियाचा सुपर 4 मध्ये धमाकेदार विजय, बांगलादेशचा 8 विकेट्सने धुव्वा
U19 Womens T20 Asia Cup 2024 IND vs BAN : टीम इंडियाने 20 षटकांच्या सामन्यात बांगलादेशवर 47 चेंडू राखून विजय मिळवला आहे.
अंडर 19 वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानंतर आता टीम इंडियाने सुपर 4 मध्ये बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 8 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 81 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 47 चेंडू राखून पूर्ण केलं. टीम इंडियाने 12.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 86 धावा केल्या. आयुशी शुक्ला आणि गोंगाडी त्रिशा या दोघी टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. त्रिशाने अर्धशतकी खेळी केली. त्रिशाने 46 बॉलमध्ये 58 रन्स केल्या. तर त्याआधी आयुषी शुक्ला हीने 3 तर सोनम यादवने 2 विकेट्स घेतल्या. त्रिशाला अर्धशतकी खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
बांगलादेशने पहिले बॅटिंग करत 8 विकेट्स गमावून 80 धावा केल्या. कॅप्टन सौम्या अख्तर हीने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.सादिया अख्तर 2 धावा करुन आऊट झाली. आफियाला भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियाच्या आयुषीने घातक बॉलिंग केली. आयुषीने 4 ओव्हरमध्ये 9 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर सोनम यादव हीने 4 ओव्हरमध्ये 6 रन्स देत 2 विकेट्स मिळवल्या. तर मिथीला विनोद आणि शबनम शकील या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाने 73 चेंडूंमध्ये 81 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. टीम इंडियाची सलामीवीर फलंदाज त्रिशाने 10 चौकारांसह 46 चेंडू 58 धावा केल्या. कॅप्टन निकी प्रसादने 14 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह 22 रन्स केल्या. या दोघींच्या खेळीने भारताला सहज विजय मिळवता आला. बांगलादेशकडून अनिसा सोबा हीने दोन्ही विकेट्स मिळवल्या.
गोंगाडी त्रिशा मॅन ऑफ द मॅच
G Trisha top-scores with 58*(45) as #TeamIndia complete an eight-wicket win over Bangladesh Women U19 in the #ACCWomensU19AsiaCup 👏👏
Scorecard – https://t.co/adCdJo0ATc#ACC pic.twitter.com/LlccBWizXJ
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
दरम्यान टीम इंडियाचा सुपर 4 मधील पुढील सामना हा श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना शुक्रवारी 20 डिसेंबरला होणार आहे.