U19 AUS vs PAK Live Streaming | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने, सामना केव्हा आणि कधी?
U19 Australia vs Pakistan Semi Final Live Streaming | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
बेनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने या विजयासह अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सलग पाचव्यांदा आणि एकूण नवव्यांदा धडक दिली. आता स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी खेळेल. ह्यू वेबगेन याच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व आहे. तर साद बेग पाकिस्तानचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले. तर सुपर 6 राउंडमध्ये पाकिस्तानने विजयी तडाखा सुरु ठेवत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा सुपर 6 मधील दुसरा सामना हा विंडिज विरुद्ध होता. मात्र त्या सामन्याचा निकाल लागला नाही. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा केव्हा होणार? सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे सर्वकाही आपण जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा सेमी फायनल सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा सेमी फायनल सामना हा गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं आयोजन हे विलोमूर पार्क बेनोनी येथे करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या एपवर मोफत पाहता येईल.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, हरजस सिंग, सॅम कोन्स्टास, ऑलिव्हर पीक, लचलान एटकेन (विकेटकीपर), राफ मॅकमिलन, हरकिरत बाजवा, चार्ली अँडरसन, महली बियर्डमन, कॅलम विडलर, रायन हिक्स, टॉम कॅम्पबेल, टॉम स्ट्रेकर, एडन ओ. कॉनर आणि कोरी वॉस्ले.
पाकिस्तान क्रिकेट टीम | साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमील हुसैन, शाहजैब खान, अझान अवेस, अहमद हसन, हारून अर्शद, अराफत मिन्हास, उबेद शाह, मोहम्मद झीशान, अली असफंद, अली रझा, अमीर हसन, खुबैब खलील, नावेद अहमद खान आणि मोहम्मद रियाजुल्ला.