NZ vs AFG | न्यूझीलंडचा 1 विकेटने रडत रडत विजय, अफगाणिस्तानने झुंजवलं
U19 Wc 2024 New Zealand U19 vs Afghanistan Highlights | अफगाणिस्तानने न्यूझीलंडची शेवटपर्यंत हवा टाईट करुन ठेवली होती. मात्र अखेरच्या क्षणी 1 विकेट हाती असताना न्यूझीलंडने विजय मिळवला. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा विजय ठरला.
मुंबई | अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना लो स्कोअरिंग सामन्याचा हायव्होल्टेज थरार पाहायला मिळाला. या 11 व्या सामन्यात डी ग्रुपमधील न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने होते. या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 1 विकेटने मात करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 92 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा चांगलाच घाम काढला. न्यूझीलंडने विजय मिळवला खरा, मात्र अफगाणिस्तानने चांगलंच झुंजवलं.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडची 92 धावांचा पाठलाग करताना हवा काढली. मात्र अफगाणिस्तानपासून विजय फक्त 1 विकेट दूर राहिला. न्यूझीलंडने 92 धावांचं आव्हान हे 9 विकेट्स गमावून 28.2 ओव्हरमध्ये पू्र्ण केलं. न्यूझीलंडकडून कॅप्टन ओस्कर जॅक्सन याने सर्वाधिक 26 धावांची खेळी केली.
लचलान स्टॅकपोल याने 12 धावा केल्या. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांनी एकेरी धावा करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून अल्लाह गझनफर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. खलील अहमद आणि अरब मोमंद याने दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन नसीर खान मारुफखील याच्या खात्यात 1 विकेट गेली.
न्यूझीलंड नंबर 1
दरम्यान न्यूझीलंडने या दुसऱ्या विजयासह डी ग्रुपमध्ये अव्वलस्थानी पोहचली आहे. न्यूझीलंडकडे 4 पॉइंट्ससह आहेत. तर +1.740 इतका नेट रनरेट आहे. न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात नेपाळवर 64 धावांची विजय मिळवला. आता न्यूझीलंड आपला साखळी फेरीतील अखेरचा सामना हा 27 जानेवारी रोजी खेळणार आहे. न्यूझीलंडसमोर या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
न्यूझीलंड 1 विकेटने विजयी
The #U19WorldCup 2024 saw a heart-stopping thriller that could’ve swung either way till the very last moment 🔥#NZvAFGhttps://t.co/HjJICYpk2P
— ICC (@ICC) January 23, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | ऑस्कर जॅक्सन (कॅप्टन), टॉम जोन्स, ल्यूक वॉटसन, रॉबी फॉल्केस, ऑलिव्हर टेवाटिया, लचलान स्टॅकपोल, झॅक कमिंग, सॅम क्लोड (डब्ल्यूके), मॅट रो, इवाल्ड श्र्यूडर आणि रायन त्सोर्गस.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | नसीर खान मारूफखिल (कर्णधार), जमशीद झद्रान, खालिद तानिवाल, रहीमुल्ला झुरमाती, हसन इसाखिल, नुमान शाह (विकेटकीपर), सोहेल खान झुरमती, अरब गुल मोमंद, अल्लाह गझनफर, खलील अहमद आणि बशीर अहमद.