IND VS PAK : पाकिस्तानी गोलंदाजाकडून टीम इंडियाच्या खेळाडूला मारण्याचा प्रयत्न! व्हीडिओ व्हायरल
India vs Pakistan | आतापर्यंत अनेकदा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामने झाले आहेत. त्यापैकी काही सामन्यांचा अपवाद वगळता अनेकदा वाद झाले आहेत. आता पुन्हा एकदा टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान झालेल्या एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दुबई | दुबईत एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काऊन्सिलने अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं आयोजन केलं आहे. टीम इंडियाने 8 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानचा पराभव करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात कडवट प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बीडच्या सचिन धस याने अखेरच्या क्षणी केलेल्या 58 धावांच्या जोरावर टीम इंडियाला 250 धावांपुढे पोहचता आलं. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 259 धावा केल्या. त्यामुळे आता पाकिस्तानसमोर विजयासाठी 260 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाकडून सचिन धससह एकूण तिघांनी अर्धशतकी खेळी केली.
टीम इंडियाकडून ओपनर आदर्श सिंह याने टीम इंडियासाठी सर्वाधिक 62 धावा केल्य. तर कॅप्टन उदय सहारन याने 60 धावांचं योगदान दिलं. सचिन धस, आदर्श सिंह आणि उदय सहारन या तिघांशिवाय एकालाही मोठी खेळी करता आली नाही. तर पाकिस्तानकडून मोहम्मद जीशान याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर अमीर हसन आणि कुवैत शाह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा
दरम्यान टीम इंडिया आणि पाकिस्तान सामना आणि काहीच वाद झाला नाही, असं आतापर्यंत क्वचित झालं नाही. टीम इंडिया-पाकिस्तान या सामन्यात असं काही घडलं की ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर इतर गोलंदाजांप्रमाणे जल्लोष केला. मात्र हा जल्लोष नाही तर हा उन्माद होता. पाकिस्तानच्या गोलंदाजाने विकेट घेऊन टीम इंडियाच्या फलंदाजाजवळ येऊन फाईट मारण्याचा प्रयत्न केला असं या व्हायरल व्हीडिओतून दिसत आहे.
व्हायरल व्हीडिओत नक्की काय?
पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद जीशान हा टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान 12 वी ओव्हर टाकायला आला. जीशानसमोर रुद्र पटेल बॅटिंग करत होता. जीशानने रुद्रला कॅच आऊट केलं. जीशानने रुद्रला आऊट केल्यानंतर जल्लोष कमी आणि उन्माद केला. जीशानने रुद्रजवळ जाऊन बुक्की मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. मात्र रुद्र पटेल याने जीशानच्या या उन्मादावर दुर्लक्ष केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
व्हायरल व्हीडिओ
— LePakad7🇮🇳🇮🇹 (@AreBabaRe2) December 10, 2023
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमिल हुसैन, शाहजैब खान, अझान अवेस, मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफत मिन्हास, अली असफंद, अमीर हसन आणि उबेद शाह.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कॅप्टन), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, रुद्र पटेल, मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी आणि नमन तिवारी.