U19 IND vs AUS Final | टीम इंडियासमोर 254 धावांचं आव्हान, कोण जिंकणार वर्ल्ड कप?

India U19 vs Australia U19 Final 1st Innings Highlights In Marathi | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला एकूण सहाव्यांदा विश्व विजेता होण्यासाठी 254 धावांचं आव्हान दिलं आहे.

U19 IND vs AUS Final | टीम इंडियासमोर 254 धावांचं आव्हान, कोण जिंकणार वर्ल्ड कप?
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 5:40 PM

बेनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप फायनल 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने भारतीय क्रिकेट संघाला विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या. अंडर 19 वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियासमोरचं आव्हान हे डोंगराएवढं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे टीम इंडियाला 254 धावा करुन इतिहास रचण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंग याने सर्वाधिक धावा केल्या. हरजस याने 64 बॉलमध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. तर कॅप्टन ह्यू वेबगेन याने 48 धावांचं योगदान दिलं. ऑलिव्हर पीक याने 43 बॉलमध्ये नाबाद 46 धावा केल्या. तर ओपनर हॅरी डीक्सन याने 42 धावा जोडल्या. विकेटकीपर रायन हीक्स याने 20 आणि चार्ली एंडरसन याने 13 धावा जोडल्या. तर टीम इंडियाकडून राज लिंबानी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नमन तिवारी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सॉमी पांडे आणि मुशीर खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

हे सुद्धा वाचा

आता फलंदाजांवर मदार

दरम्यान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 260 धावांच्या आत रोखल्यानंतर आता टीम इंडियाच्या फलंदाजांवर सर्व जबाबदारी आहे. टीम इंडियाचे फलंदाजांनी या स्पर्धेत आतपर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. कॅप्टन उदय सहारन, बीडचा सचिन धस, सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान आणि आदर्श सिंह यांनी बॅटिंगने अफलातून खेळी केली आहे. आता या फलंदाजांकडून अशाच तडाखेदार फलंदाजीची अपेक्षा असणार आहे.

ऑस्ट्रेलियाला 254 धावांवर रोखण्यात यश

ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर

टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.